Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

बिझनेस आयडिया ! चिंच प्रक्रिया उद्योग देईल लाखो कमावण्याची संधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती

0 15

MHLive24 टीम, 02 जुलै 2021 :-  चिंच हे सर्वाना माहिती असणारे आणि सर्वत्र उपलब्ध असणारे फळ आहे. चिंच कुळात एकूण २४ उपजाती आहेत. चिंच हा मुळ आफ्रिकेतला वृक्ष आहे. आशिया व अमेरिकेत पसरला आहे.

पारशी भाषेत त्याला तमर-ई-हिंद म्हणजेच भारतीय खजूर म्हणतात. कारण शेतकर्यांच्या उत्पन्नाचे तो एक चांगले साधन बनला आहे. आपण त्यापासून खालील काही पदार्थ बनवून बरीच कमाई करू शकता.

Advertisement

सिरप :– पूर्ण पिकलेल्या चिंचा यांचे हाताने टरफल काढणे त्यानंतर बी सह गर रात्रभर गरम पाण्यात ठेवणे. तसेच त्यामुळे बी पासून गर वेगळा होण्यास मदत होते. लायनर फिल्टर मधून गाळून घेणे नंतर त्याला गरम पाण्याने धुवावे. गर् व पाणी 1:2 या प्रमाणात मिसळावे. पातळ मिश्रण सेंट्रीफ्यूज करावे.

तयार झालेल्या गरापासून नेहमीच्या पद्धतीप्रमाणे सिरप तयार करता येते. तयार झालेल्या सीरप मध्ये खालील प्रमाणे घटक पदार्थ असावेत. गर 20 ते 24 टक्के, साखर 56.5 टक्के, एकूण विद्राव्य घटक 56.30 टक्के, रेड्युसिंग शुगर 43.80 टक्के आम्लता 1.11 टक्के. चिंच गराचा उपयोग जॅम जेली आइस्क्रीम व थंडपेय इत्यादी पदार्थ मध्ये करतात.

Advertisement

रस :– गरामध्ये निर्लोपीन 12 ते 15 टक्के मिसळावे. हे द्रावण 60 ते 100 सेंटीग्रेड तापमानाला दहा ते पंधरा दिवस ठेवण. तळाशी साचलेला शाखा ढवळनार नाही अशा बेताने वरील द्रावण एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतावे. एसबेसटॉस चा उपयोग करून निर्वातमधून गाळून घेणे.

या द्रावणाची आम्लता 75 ते 80 व ब्रिक्स 18% स्थिर करणे, 80 ते 75 डी सेंटीग्रेड तापमान आला पाच मिनिटे निर्जंतुकीकरण करणे व त्यानंतर आपणास मिळतो तो चिंचेचा रस. रसापासून चांगल्या पद्धतीचे अर्क सुद्धा करता येते.

Advertisement

त्याकरिता रस निर्वात बास्पी पत्राच्या सहाय्याने टी एस एस 65 ते 68 डी ब्रिक्‍स येईपर्यंत आठवून करावा अशा तीव्र रसास अर्क संबोधले जाते. या तयार झालेल्या अर्कास चिंचेचा सुगंध व वास येईल याची काळजी घ्यावी. हा तयार अर्क सरबत, सिरप तयार करण्यासाठी सुद्धा वापरता येत.

शीतपेय तयार करणे :- साहित्य( एक लिटर साठी)- चिंचेचा अर्क 100 मिली, साखर 131 ग्रॅम, सायट्रिक आम्ल 0.8ग्रॅम, पाणी 782.2मिली, सोडियम बेंजोएट 0.15 ग्राम इत्यादी

Advertisement

कृती :- शीतपेय तयार करणे करीता चींचगर नऊ ते 12 टक्के घेऊन त्याचा ब्रिक्स 21.5डी. स्थिर करावा. नंतर तयार झालेले मिश्रण 85 टक्के सेंटीग्रेड तापमानला 20 ते 25 मिनिटे पर्यंत निर्जंतुक करून अगोदर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यात किंवा कॅन मध्ये भरून ते 29.4डी.सेंटीग्रेड तापमानाला साठवावे.

अशा प्रकारे तयार केलेले पेय एक वर्षापर्यंत चांगल्या स्थितीत राहते. अशा प्रकारे दुर्लक्षित परंतु उपयुक्त अशा चिंच फळा पासून आणि प्रकारचे चवदार मधुर पदार्थ तयार करता येतात.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit