Business Idea
Business Idea

MHLive24 टीम, 27 मार्च 2022 :- Business Idea : जर आपल्याकडे बुद्धिमत्ता असेल तर आपण काहीही करु शकतो. असच काही लंडनमधील एका महिलेने केले आहे. या महिलेने एक अनोखा व्यवसाय सुरु केला आहे. तीने आईच्या दुधापासून दागिने बनवून त्यांनी नव्या व्यवसायाचा पाया घातला. आता ती या व्यवसायातून लाखो रुपये कमवत आहे.

खरं तर, लंडनस्थित मॅजेन्टा फ्लॉवर्स नावाची कंपनी आहे, जी आईच्या दुधापासून बनवलेल्या दागिन्यांचा व्यवसाय तर करतेच, पण या व्यवसायातून करोडो रुपयांचा नफाही कमावते.

आता ‘ब्रेस्ट मिल्क ज्वेलरी’ ही संकल्पना फॅशन इंडस्ट्रीतही खूप लोकप्रिय होत आहे. भारतातही हा व्यवसाय सुरू झाला आहे. या व्यवसायाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा नफ्याशी भावनिक संबंध आहे.

त्याची सुरुवात प्रथम लंडनमध्ये झाली

हा व्यवसाय सुरू करण्याचे श्रेय लंडनमधील एका महिलेला जाते, जी तीन मुलांची आई आहे, साफिया रियाध. या महिलेने सर्वप्रथम स्वतःच्या दुधापासून दागिने बनवले. त्यानंतर या व्यवसायात तिला पतीची साथ मिळाली.त्याबाबत अधिक माहिती घेऊन त्यांचे पती अॅडम रियाद यांनी याची सुरुवात केली.पती-पत्नी दोघांनी मिळून मॅजेन्टा फ्लॉवर्स नावाची कंपनी सुरू केली.

असे काय आहे जे या व्यवसायाला विशेष बनवते

आता ही कंपनी खूप पुढे गेली आहे. आणि या कंपनीला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.आतापर्यंत या कंपनीने ब्रेस्ट मिल्क ज्वेलरीच्या 4000 हून अधिक ऑर्डर पूर्ण केल्या आहेत.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup