चीनमध्ये ‘चायना इस्टर्न एअरलाइन्स’चं एक प्रवासी विमान गुआंगशी परिसरात कोसळलं आहे. या विमानातून १३३ प्रवासी प्रवास करत होते.

अपघातानंतर मोठी आग लागल्याने हे सर्व प्रवासी आत अडकले असून त्यांच्याबद्दल अद्याप काहीही माहिती मिळू शकलेली नाही.

एका पर्वताच्या कड्याला आदळून विमानानं पेट घेतला. त्यानंतर ते विमान दरीत कोसळलं, अशी प्राथिमक माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे.

अघातानंतर त्या भागात मोठी आग लागली असून दूरपर्यंत धुराचे लोट पसरले आहेत. ज्या भागात अपघात झाला, तो दक्षिण चीनमधील दुर्गम भाग असून तेथे बचावकार्य पोहचण्यास वेळ लागत आहे.