BREAKING | पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारी घटना … ३० जणांनी मिळून १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर फार्म हाऊसवर….

MHLive24 टीम, 23 सप्टेंबर 2021 :- पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारी धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती नुकतीच समोर आलीय.

डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची अल्पवयीन आहे. आरोपींचा शोध सध्या सुरु आहे.

डोंबिवलीच्या भोपर परिसरात ही घटना घडली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ३० आरोपींनी मिळून सामूहिक बलात्कार केला . आरोपींमधील २२ जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Advertisement

अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करताना व्हिडीओ काढला आहे. या व्हिडीओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल केलं जात होतं.

यानंतर मुलीला फार्म हाऊसवर नेऊन आरोपींकडून आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. बुधवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला असून मानपाडा पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker