Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

अब्जाधीश मुकेश अंबानी यांनी उलगडला आपल्या वडिलांचा ‘सक्सेस मंत्र’; वाचा…

Advertisement

रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचा यशस्वी मंत्र काय होता? हे एका कार्यक्रमात त्यांचा मुलगा आणि आरआयएलचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले होते. आपला देश चीनला कसे मागे टाकू शकतो हेदेखील त्यांनी स्पष्ट केले होते.

ही घटना वर्ष 2018 ची आहे. अंबानी रिपब्लिक समिट 2018 मध्ये दाखल झाले होते. त्यानंतर त्यांना रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी याना त्यांनी सांगितले होते की, ” आपल्या देशात 10 धीरूभाई अंबानी तयार न होता शेकडोंच्या घरात निर्माण व्हावेत. जेणेकरून या देशाचा विकास होऊ शकेल.”

ते म्हणाले, “चीन ही आज दहा ट्रिलियन अर्थव्यवस्था आहे. माझे वडील नेहमी म्हणत असत की जर तुम्ही तुमचा विचार बदलला तर नशीब बदलेल. आपले मन बदलणे कठीण आहे. ही पहिली गोष्ट आहे आणि मला वाटते की नवीन पिढी पूर्णपणे नवीन विचारसरणीची आहे.

Advertisement

” रिलायन्सचे अध्यक्ष पुढे म्हणाले, “जेव्हा मी एका 30 वर्षीय व्यक्तीबरोबर असतो तेव्हा मला तरूण असल्यासारखे वाटते आणि ते मला JIO, तंत्रज्ञान इत्यादी बद्दल शिकवतात.” म्हणूनच आम्ही यशस्वी होत आहोत. “

दुसर्‍या मुद्दय़ाचा संदर्भ देताना ते म्हणाले की आपण अशा काळात प्रवेश करत आहोत ज्याला ‘घातांकारी’ असेही म्हटले जाऊ शकते, आपण लिनियर एरा मध्ये प्रगती केली आहे. या दोघांमधील फरक असा आहे की जर आपण लीनियर मध्ये 10 पाऊले पुढे चाललो तर आपण तीन पाऊलच पुढे जाऊ.

मग 10 पर्यंत पोहोछतो. पण एक्सपोनेन्शियल मध्ये, आपण एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ अशा पद्धतीने 10 पर्यंत पोहोचतो. आम्ही 10 वर पोहोचतो तोपर्यंत आपण एक अब्ज पाऊल पुढे गेलेलो असतो. म्हणूनच आम्ही वेगाने पुढे जात आहोत आणि भारताला पुढे जाण्याची ही चांगली वेळ आहे.

Advertisement

संभाषणादरम्यान अंबानी यांनी असेही स्पष्ट केले होते की उद्योजकताची व्याख्या ही आहे की ती एक मोठी समस्या शोधून ती सोडविणे. पाश्चिमात्य देशातील माझ्या बर्‍याच मित्रांनी मला चिडवले आहे की, भारत एक अब्जवधी समस्या असलेला देश आहे. पण मी त्यांना उत्तर देतो की नाही. आमचा देश अब्जवधी समस्या नसून अब्जावधी संधी असणारा देश आहे.