Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी! राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतली एकनाथ खडसेंची भेट…

0

Mhlive24 टीम, 17 ऑक्टोबर 2020 :- भारतीय जनता पक्षातील नाराज नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सर्वाना आतुरता लागली आहे. नुकतीच एकनाथ खडसे यांनी आज राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची भेट घेत आहेत.

Advertisement

गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. आता चर्चेला नवीन वळण मिळाले आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आहे.

Advertisement

रावेरच्या शासकीय विश्रामगृहात ही भेट पार पडली. त्यावेळी शासकीय विश्रामगृहाबाहेर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. आता देशमुख आणि खडसे भेटीतून काही नवे घडणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement

जळगाव जिल्ह्यातील रावेर बोरखेडा शिवारातील चार अल्पवयीन बालकांची हत्येची घटना शुक्रवारी घडली होती. या चारही मुलांवर रावेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

Advertisement

या ठिकाणी कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख हे एकत्र पोहोचले आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही रंगली होती.

Advertisement

मात्र, एकनाथ खडसे यांच्या संभाव्य राष्ट्रवादीतील प्रवेश हा लांबणीवर पडला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधान परिषदेच्या उमेदवारांबाबत निर्णयानंतरच पक्षांतराचा मुहूर्त ठरू शकतो अशी शक्यता त्यांचे निकटवर्तीय व्यक्त करत आहेत.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li