मोठी बातमी: स्टेट बँकेसह 14 बँकांवर रिझर्व्ह बँकेची कारवाई; वाचा सविस्तर…

MHLive24 टीम, 09 जुलै 2021 :- कर्ज वितरणासंदर्भात काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल केंद्रीय बँक आरबीआयने 14 बँकांना दंड ठोठावला आहे. या बँकांमध्ये देशातील सर्वात मोठी भारतीय स्टेट बँक (एसबीआय) देखील समाविष्ट आहे. याशिवाय आरबीआयने इंडसइंड बँक, बंधन बँक आणि बँक ऑफ बडोदालाही दंड आकारला आहे.

रिझर्व्ह बॅंकेच्या म्हणण्यानुसार, बँकांनी नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांना (एनबीएफसी) कर्ज देण्यासाठी केंद्रीय बँकेने ठरविलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या तरतुदींचे उल्लंघन केले आहे. या व्यतिरिक्त या बँकांनी निर्बंधाशी संबंधित तरतुदी आणि कर्ज आणि ऍडव्हान्सच्या तरतुदींचे पालन केले नाही आणि केंद्रीय डेटाबेसमध्ये यासंदर्भात माहिती देण्यास दुर्लक्ष केले आहे.

Advertisement

या बँकांवर आरबीआयने 50 लाख ते 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ज्या बँकांवर दंड ठोठावण्यात आला आहे त्यात सार्वजनिक, खाजगी, विदेशी, को-ऑपरेटिव आणि लघु वित्त बँकांचा समावेश आहे.

या बँकांना इतका दंड ठोठावण्यात आला

Advertisement
  •  2 कोटी रुपये : बँक ऑफ बडोदा,
  • 1 कोटी रुपये : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, क्रेडिट सुईस एजी, बंधन बँक, इंडियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, करूर वैश्य बँक, कर्नाटक बँक, पंजाब आणि सिंध बँक, जम्मू-काश्मीर बँक,
  • 50 लाख रुपये: एसबीआय

सामान्य व्यवहार आणि करारांवर कोणताही परिणाम होणार नाही :- बँकिंग रेगुलेशन एक्ट, 1949 च्या कलम 46(4) (आई) आणि 51(1), 47(ए)(1)(सी) च्या तरतुदींनुसार आरबीआयने हा दंड आकारला आहे. रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जेव्हा एका समूहाच्या कंपन्यांच्या खात्यांची छाननी केली गेली तेव्हा असे दिसून आले की बँकांनी बँकिंग रेग्युलेशन कायद्यातील अनेक तरतुदींचे उल्लंघन केले आहे.

यानंतर आरबीआयने संबंधित बँकांना नोटीस बजावत त्यांना दंड का आकारला जाऊ नये, अशी विचारणा केली. केंद्रीय बँकेच्या या नोटीसवर बँकांनी पाठविलेल्या उत्तराच्या आधारे आरबीआयने या बँकांवर दंड आकारला आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई नियामक पालनाच्या उल्लंघनाशी संबंधित आहे आणि त्याचा ग्राहकांशी संबंधित व्यवहार किंवा करारावर कोणताही परिणाम होणार नाही.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement