Breaking News Updates of Maharashtra , Latest Politics,Crime, Entertainment, Sports,Money And Lifestyle News 

मोठी बातमी : येत्या दहा दिवसांत ठरणार लॉकडाउनचा निर्णय !

Mhlive24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “येत्या 8 ते 10 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर टाळेबंदीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल”. दिवाळीनंतर राज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढला आहे.

Advertisement

हिवाळ्यात हा वेग आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. रोज 5 हजारांच्या सुमारास कोरोनाग्रस्त रुग्ण वाढत आहे.

Advertisement
class="adsbygoogle" style="background:none;display:inline-block;max-width:800px;width:100%;height:100px;max-height:100px;" data-ad-client="ca-pub-9385025845051934" data-ad-slot="9434371502" data-ad-format="auto" data-full-width-responsive="true">

रोजच्या आकडेवाडीवर सरकारची नजर आहे. पुढचे 15 दिवस कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढल्यास म्हणजे दररोज 5 हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले तर सरकार गंभीर विचार करणार आहे. त्याप्रकारचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

Advertisement

डिसेंबरमध्ये महापरिनिर्वाणदिन, दत्त जयंती आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोकं आणखी घराबाहेर पडणार आहेत. महापरिनिर्वाणदिनी लोकांनी घरातून अभिवादन करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. दत्तजयंती, नाताळ आणि नवीन वर्षासाठी खास नियमावली बनवणार आहे.

Advertisement

दिवाळीत बाहेरगावी ये जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वर्षाच्या अखेरीस सेलिब्रेशनसाठी बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असणार आहे. त्यावर वेळीच निर्बंध घालण्याचा विचार सुरू आहे. लांब पल्ल्यांच्या रेल्वे आणि विमान सेवा काही कालावधीसाठी बंद करण्याचा विचार सुरु आहे

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li