Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

मोठी बातमी : गॅस सिलेंडर संदर्भात शासनाचा मोठा निर्णय; होणार फायदाच फायदा

0

MHLive24 टीम, 11 जून 2021 :-  केंद्र सरकारने एलपीजी रिफिल पोर्टेबिलिटीला मान्यता दिली आहे. आता एलपीजी सिलिंडर ग्राहक कोणत्याही वितरकांकडून सिलिंडर भरण्यास सक्षम असतील. आपल्याकडे भारत गॅस सिलिंडर असल्यास आपण इंडेन किंवा एचपीसीएलच्या गॅस वितरकांकडून सिलिंडर खरेदी करू शकता. आपण आपल्या सध्या सुरु असणाऱ्या असलेल्या तेल मार्केटिंग कंपनीच्या सेवेवर खुश नसल्यास आपण इतर कंपनीच्या डिस्ट्रीब्यूटर्सची सेवा घेऊ शकता.

सध्या पायलट प्रकल्पांतर्गत या शहरांमध्ये स्कीम लॉन्च :- पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने म्हटले आहे की नवीन नियमानुसार जर ग्राहकांना सेवा आवडत नसेल तर तो आपल्या पत्त्यावर अन्य तेल मार्केटिंग कंपन्यांच्या वितरकांकडून एलपीजी मागवू शकतो. सध्या ही योजना चंदीगड, कोयंबटूर, गुडगाव, पुणे आणि रांची येथे पायलट प्रकल्प म्हणून सुरू केली जाईल.

Advertisement

त्यानंतर इतर राज्यातही याची सुरूवात होईल. डिजिटल एलपीजी पोर्टेबिलिटीअंतर्गत ग्राहक मोबाईल अॅप किंवा पोर्टलवर लॉग इन करून ग्राहक त्यानुसार वितरक निवडू शकतील. आपण इच्छित असल्यास, आपण सिलिंडर रीफिलची बुकिंग करू शकता किंवा इतर सुविधांचा लाभ घेऊ शकता.

अ‍ॅप किंवा पोर्टलवर लॉगिन करून डिस्ट्रीब्यूटर निवडू शकतो :-  ग्राहक जर गॅस सिलिंडरसाठी मोबाईल अ‍ॅप किंवा कस्टमर पोर्टलवर लॉग इन करत असेल तर त्यास डिलीवरी डिस्ट्रीब्यूटर्सची संपूर्ण यादी दिसेल. येथे रफॉरमेंसवर आधारित त्याचे रेटिंग देखील दर्शविले जाईल. याद्वारे ग्राहक आपल्या आवडीनुसार डिस्ट्रीब्यूटर्स पिक करू शकेल आणि त्याच्याकडील गॅस सिलिंडर मागू शकेल.

Advertisement

यामुळे डिस्ट्रीब्यूटर्स वर परफॉर्मेंस सुधारण्यासाठी दबाव आणला जाईल. किचन गॅस सिलिंडर ग्राहक उमंग अॅप किंवा भारत बिल पे सिस्टमद्वारे एलपीजी रिफिल बुक करू शकतात. ग्राहकांना पेमेंटसाठी ऑनलाइन पर्यायही मिळेल.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement