Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

मोठी बातमी : अंबानी बंधूना मोठा दंड; मुकेश अंबानी करणार अपील , जाणून घ्या प्रकरण

Advertisement

अलीकडेच अंबानी कुटुंबाला दोन दशकांपूर्वीच्या शेअर अनियमिततेच्या प्रकरणात दंड ठोठावण्यात आला आहे. हे दंड बाजार नियामक सेबीने लादले आहेत. आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी त्याविरूद्ध अपील करतील. रिलायन्स इंडस्ट्रीजने ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे.

काय प्रकरण आहेः धीरूभाई अंबानी रिलायन्सचे नेतृत्व करीत होते. त्यावेळी रिलायन्स ग्रुपचे विभाजन झाले नव्हते. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) 1994 मध्ये कन्व्हर्टेबल वॉरंटसह डिबेंचर्स जारी केले आणि या वॉरंटच्या बदल्यात 2000 मध्ये इक्विटी शेयर वाटप केले.

सेबीच्या मते, रिलायन्सच्या प्रवर्तक आणि संबंधित इतरांनी सन 2000 मध्ये कंपनीत 5 टक्क्यांहून अधिक हिस्सा खरेदी केला होता, जो नियमांचे उल्लंघन करीत आहे.

Advertisement

या प्रकरणात सेबीलाही व्यवस्थित माहिती दिली गेली नव्हती. सेबीने फेब्रुवारी 2011 मध्ये या प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावली होती. शेअर्सचे अधिग्रहण झाल्यानंतर 11 वर्षांनंतर तत्कालीन प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाला नोटीस बजावण्यात आली होती. सेबीने अधिग्रहण नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.

आता घेतला निर्णयः कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर जवळपास 10 वर्षांनंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शेयर अधिग्रहणच्या 21 वर्षानंतर आला आहे. यात कंपनीच्या प्रमोटर्सना त्यावेळी 25 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

त्यावेळी रिलायन्सचे विभाजन झाले नव्हते. त्यामुळे अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नीवरही हा दंड आकारण्यात आला आहे. मुकेश आणि अनिल यांच्यात 2005 मध्ये फुट पडली होती.

Advertisement

रिलायन्स इंडस्ट्रीज नव्या तयारीत: दरम्यान, मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज आता पेमेंट सर्व्हिसेस कंपनीची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार रिलायन्सने ‘न्यू अंब्रेला एंटिटी’ (एनयूई) प्रस्तावित केले आहे. रिलायन्सने एनयूईमार्फत जागतिक पेमेंट्स कंपनी बनण्याची योजना आखली आहे.

फेसबुक आणि गुगल सारख्या कंपन्याही यात सहयोग करणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचा 40 टक्के हिस्सा असू शकतो, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. उर्वरित तीन कंपन्यांचा 20-20 टक्के हिस्सा असू शकतो. जर सर्व काही ठीक झाले तर रिलायन्समुळे व्हिसा आणि मास्टरकार्डसारख्या दिग्गजांचे टेन्शन येत्या काही वर्षांत वाढेल.

Advertisement