BIG NEWS : एअर इंडिया टाटा समूहाने केले खरेदी ? परंतु किती रुपयांची बोली लावली? वाचून बसेल धक्का !

MHLive24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- सरकारी कंपनी असलेली एअर इंडिया ही कंपनी आता टाटा खरेदी करणार आहेत. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, पॅनलने एअर इंडियासाठी टाटा समूहाची निवड केली आहे.(BIG NEWS)

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील समिती एअर इंडियाच्या खरेदीसाठी आलेल्या प्रस्तावांचा विचार करुन लवकरच निर्णय घेईल. यामध्ये टाटाने लावलेल्या बोलीचा आकडा प्रचंड आहे.

टाटा समूहाने एअर इंडियाच्या खरेदीसाठी तब्बल ५००० कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविली आहे.

Advertisement

जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान विमान सेवा बंद करण्यात आली होती.

जेव्हा विमानसेवा पुन्हा सुरू झाली, तेव्हा २९ जुलै १९४६ रोजी टाटा एअरलाइन्सचे नाव बदलून एअर इंडिया लिमिटेड करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर, १९४७ मध्ये एअर इंडियाचा ४९ टक्के सहभाग सरकारने आपल्या ताब्यात घेतला. आणि १९५३ मध्ये त्याचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया तोट्यात आहे. एअर इंडियावरील कर्जाचा बोजा सतत वाढत आहे. एअर इंडियावर ३८ हजार ३६६ कोटी रुपयांचे कर्ज आहे. सरकारी खात्याने एअर इंडियाचे 500 कोटी रुपये थकवले आहेत.

Advertisement

तसेच एअर इंडियाकडे एकूण 46 हजार कोटी रुपयांची संपत्ती असून यात जमीन, इमारतींचा समावेश आहे. तोटा वाढत चालल्याने मागील २० वर्षांपासून एअर इंडिया विकण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्यावेळी 20 टक्के भाग विकण्याचा प्रयत्न होता.

मात्र सरकारी अटी आणि कर्जामुळे डुबलेल्या एअर इंडियाला खरेदीसाठी कुणी पुढे येत नव्हते. तसेच २०१७ मध्ये ७४ टक्के भाग विकण्याचा विचार करण्यात आला होता. पुढे पूर्ण १०० टक्के कंपनी विकण्याचे निश्चित करण्यात आले.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker