Take a fresh look at your lifestyle.

बिग ब्रेकिंग : सोनिया गांधींनी दिल्ली सोडली

0 83

Mhlive24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी हे दिल्लीतून गोव्यात पोहोचले आहेत. पुढील काही दिवस दोघांचा गोव्यात मुक्काम असणार आहे.

Advertisement

सोनिया गांधी 73 वर्षांच्या आहेत. त्यांना दिल्लीच्या वाढत्या प्रदूषणाचा त्रास होत आहे. हा त्रास होऊ नये म्हणून डॉक्टरांनी सोनिया गांधी यांना काही दिवस दिल्ली सोडून शुद्ध हवेच्या ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला.

Advertisement

या सल्ल्यानुसार सोनिया गांधी यांनी मुक्काम दिल्ली ऐवजी गोव्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनिया यांच्यासोबत राहुल गांधीही गोव्यातच असतील. मागील काही आठवड्यांपासून दिल्लीत प्रदूषण वाढले आहे. हवेची गुणवत्ता घसरली आहे.

Advertisement

श्वसनाशी संबंधित विकार असलेल्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे. आजारी असलेल्यांनाही प्रदूषणाचा त्रास होत आहे. या प्रदूषित वातावरणाचा सोनिया गांधी यांच्या तब्येतीवर ताण पडू नये म्हणून डॉक्टरांनी त्यांना हवापालटाचा सल्ला दिला आहे.

Advertisement

या सल्ल्याचे पालन करत सोनिया गांधींनी दिल्ली ऐवजी गोव्यात राहण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये तपासण्यांसाठी सोनिया गांधी अॅडमिट झाल्या होत्या. तपासण्या झाल्यानंतर आणखी वैद्यकीय तपासणी करुन घेण्यासाठी

Advertisement

सोनिया गांधी काही दिवस परदेश दौऱ्यावरही गेल्या होत्या. या दौऱ्यात काही काळ प्रियांका गांधी आणि काही काळ राहुल गांधी सोनिया यांच्यासोबत होते. वैद्यकीय तपासण्यांनंतर भारतात परतलेल्या सोनिया आता दिल्ली सोडून गोव्यात राहणार आहेत.

Advertisement

गोव्यातील वातावरणात तब्येत सुधारेल, अशी आशा सोनिया गांधी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li