Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

भाजपला मोठा धक्का ! तब्बल बारा आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन .. वाचा सविस्तर माहिती

0 8

MHLive24 टीम, 05 जुलै 2021 :- विधानसभेच्या अधिवेशनावेळी भाजप आमदारांनी गैरवतुर्णक केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये भाजपचे महत्त्वाचे नेते आणि माजी मंत्र्यांच्या समावेश आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला.

Advertisement

कुटे, आशिष शेलार, अतुल भातखळकर , गिरीश महाजन यांनी गैरवर्तन केले. दरम्यान यासर्व आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित करावं अशी मागणी आमदार अनिल परब यांनी केली होती. ती स्वीकारून त्या 12 आमदारांच 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे.

या १२ आमदारांचे झाले निलंबन !

Advertisement

अतुल भातखळकर , अभिमन्यू पवार , गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंगळे , संजय कुंटे , आशिष शेलार . योगेश सागर , नारायण कुचे , जयकुमार रावल, पराग आळवणी , कीर्ती कुमार भांगडिया या आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे.

आज ओबीसींचा इंपिरीकल डेटा केंद्राकडून मिळावा म्हणून सभागृहात ठराव मांडला, तेव्हा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आई-माईवरून शिवीगाळ केली.. खुद्द तालिका सभापती भास्कर जाधव यांच्यासमोरील माईक ओढला.

Advertisement

भास्कर जाधव यांना शिवीगाळ करण्यात आली. यासंदर्भात विधानसभेत आवाजी मतदानाने भाजप आमदारांचे निलंबन करण्यात आले. डॉ. संजय कुटे, संजय कुटे, आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, नारायण कुचे यांना एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले,

सभागृहातील ही परिस्थिती लांछनास्पद असल्याचा आरोप जाधव यांनी केला. ओबीसी समाजासाठी तुमचा राग का असावा? असा प्रतिप्रश्न करीत जाधव यांनी घडलेला प्रकार सांगितला. आम्ही काय नेमके करायला निघालोय?

Advertisement

महाराष्ट्राची संस्कृतीला काळिमा फासण्याचा हा प्रकार आहे. संसदीय कार्यमंत्र्यांना आदेशवजा सूचना म्हणजे म्हातारी मेली तरी दुःख नाही, काळ सोकावता कामा नये, याचा निर्णय झालाच पाहिजे की, शिवीगाळ कोणी केली हे समजले पाहिजे. भाजपवाले म्हणतात की, मीच शिवीगाळ केली. मीच नाही, तर संपूर्ण सभागृहाने हे ऐकलेले आहे.

देवेंद्र फडणवीस तुम्हाला राग येतो, भास्कर जाधव काय कमी आहे का? मी आक्रमक आहे, मात्र संसदीय कार्यप्रणालीत मला कधी चुकीचे बोललो म्हणून माफी मागावी लागलेली नाही. मी काहीच बोललो नाही.

Advertisement

मी सगळ्यांशी संबंध चांगले ठेवूनही तुम्ही मला शिवीगाळ करता? आमची पदे काही कायमची नसतात. म्हणूनच मी सातत्याने सौहार्दाने वागलो. इथून बाहेर पडल्यानंतर आपण सारे मित्र असतो, मात्र आत जे काही घडले, महाराष्ट्राच्या परंपरेसाठी अत्यंत चुकीचे आहे.

माझी माफी फक्त आशिष शेलार यांनीच मागितली. मात्र ती देखील अगोदर अरेतुरे करीत माझ्यावर तुटून पडल्यानंतर माफी मागितली. भास्करराव जाऊ द्या, म्हणत माफी मागितली. म्हणजे लाथ मारायची व नंतर जाऊ द्या, म्हणून..!

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit