तुम्हाला तुमच्या मास्क्ड आधार कार्ड विषयी माहिती आहे ? जाणून घ्या त्याचे फायदे

MHLive24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- आधार कार्ड हे सर्व भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. म्हणून, UIDAI म्हणजेच भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटीने लोकांसाठी अशी सुविधा उपलब्ध करून दिली होती, ज्यामुळे आधार कार्ड अधिक सुरक्षित झाले. UIDAI ने मास्क्ड आधार कार्ड सेवा प्रदान केली होती.(Masked aadhaar card )

या नवीन आधारमुळे, आधार कार्डाच्या 16 अंकांपैकी 12 अंक लपलेले आहेत आणि त्या आधारमध्ये फक्त शेवटचे 4 अंक दिसू शकतात.

आज या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मास्क्ड आधार कार्ड काय आहे आणि तुम्ही ते कसे डाउनलोड करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या नवीन मास्क्ड आधार कार्ड बद्दल सविस्तर.

Advertisement

मास्क्ड आधार कार्ड काय आहे ?

मास्क्ड आधार कार्ड म्हणजे ई-आधार कार्ड ज्यामध्ये 12 अंकी क्रमांकाऐवजी केवळ शेवटचे 4 क्रमांक दिसतात. आधार कार्ड डेटा लीक झाल्याच्या बातमीनंतर यूआयडीएआयने मास्क्ड आधारची कन्सेप्ट सुरू केली, जी नियमितपेक्षा अधिक सुरक्षित आहे.

हे मिळवणे खूप सोपे आहे आणि यूआयडीएआय वेबसाइटवर जाऊन काही आवश्यक माहिती देऊन सहज डाउनलोड केले जाऊ शकते. eaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर लॉगइन करुन तुम्ही नियमित आणि मास्क्ड आधार कार्ड डाऊनलोड करु शकता.

Advertisement

आधार कार्ड डाऊनलोड कसे कराल ?

सर्वप्रथम eaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर जा.
संकेतस्थळावर गेल्यानंतर आपला 12 अंकी आधार क्रमांक टाका.
तुम्हाला मास्क्ड आधार कार्ड हवे असल्यास तसा पर्याय निवडावा.
स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाईप करावा.
त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी स्क्रीनवर टाकून सबमिट करावा.
ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर आधार कार्डाचा तपशील आणि डाऊनलोड करण्याचे पर्याय दिसतील.

मोबाईल क्रमांकाची आधारमध्ये नोंदणी कशी कराल ?

Advertisement

तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट द्या आणि आधार कार्ड करेक्शन फॉर्म भरा.
आधारमध्ये अपडेट होण्यासाठी मोबाईल नंबर टाका.
करेक्शन फॉर्म सबमिट करा आणि प्रमाणीकरणासाठी तुमचा बायोमेट्रिक डेटा द्या.
आधार केंद्राचा कर्मचारी तुम्हाला एक पावती देईल.
पावतीवर अपडेट रिक्वेस्ट नंबर (यूआरएन) नमूद केला आहे.
यूआरएनचा वापर करून आधार अपडेट स्थिती तपासली जाऊ शकते.
आधार मध्ये मोबाईल नंबर अपडेट केल्यानंतर (आधार सोबत मोबाईल नंबर अपडेट करा), तुम्हाला दुसरे आधार कार्ड घेण्याची गरज नाही.
तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी नोंदणीकृत होताच तुमच्या नंबरवर आधार ओटीपी येणे सुरू होईल.
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही UADAI च्या टोल-फ्री नंबर 1947 वर कॉल करून आधारची अद्ययावत स्थिती देखील तपासू शकता.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker