Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

पैसे देण्यासाठी QR Code वापरत असल्यास सावधान ! होतेय ‘असे’ काही

0 0

MHLive24 टीम, 30 जून 2021 :- डीजीटल पेमेंट च्या काळात पैशांची देवाणघेवाण करणे अगदी सोपे झले मात्र याच डीजीटल पेमेंट करताना अनेक प्रकारच्या धोक्यांची शक्यता असते. यामध्ये तुमच्या बँक खात्याला धोका पोहचवून आर्थिक नुकसान होऊ शकते. कारण गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे.

यामध्ये केवळ एटीएम मध्येच हे गैरव्यवहार होत नाहीत तर QR कोडच्या मदतीने देखील युजर्सना जाळ्यात अडकवलं जात आहे. त्यामुळे आता एखाद्या दुकानात किंवा पेट्रोल पंपावर QR कोड स्कॅन करून पेमेंट करीत असाल तर वेळीच सावध होण्याची सध्या गरज आहे. दुकानदारला ऑनलाईन पैसे पाठवताना क्यूआर कोडचा वापर हमखास केला जातो. मात्र यामुळे फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

क्यूआर कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड. याद्वारे एका क्षणात खात्यातुन आपली सगळी रक्कम काढून घेतली जाऊ शकते. सुरक्षेच्या क्षेत्रात जनजागृती करण्यासाठी असणाऱ्या सरकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सायबर फ्रेंडने एका ट्वीटद्वारे अज्ञात स्रोताकडून प्राप्त झालेल्या अशा क्यूआर कोडबाबत सतर्क राहण्याची माहिती दिली आहे.

अशी क्यूआर कोड सायबर ठग वापरुन आपली फसवणूक करतात. ट्विटमध्ये असे म्हटले आहे की ‘अज्ञात स्रोताकडून मिळालेला क्यूआर कोड स्कॅन करु नका. यामुळे आपल्या खात्यातून अनधिकृत पैसे काढले जाऊ शकतात. ”खरं तर अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत ज्यात लोकांना मेसेजद्वारे बनावट क्यूआर कोड पाठवून फसवणूकीस बळी पाडले जाते.

Advertisement

यासह, संगणकावर एक संदेश पाठविला जातो, ज्यामध्ये असे सांगितले जाते की, आपल्याला खूप मोठा नफा मिळाला आहे. जेव्हा सायबर ठगांकडून पाठविलेला हा कोड स्कॅन केला जातो, तर त्वरित खात्यातून पैसे काढले जातात.

सायबर फ्रेंडने नुकत्याच केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये बायोमेट्रिक माहिती अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. संशयास्पद आणि अनधिकृत साइटवर कधीही फिंगर प्रिंट किंवा डोळयातील रेटिना स्कॅन देऊ नका.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement