Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

आधार – पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत जवळ; ‘ह्या’ पद्धतीने चेक करा तुमचे स्वतःचे स्टेटस

0 4

MHLive24 टीम, 24 जून 2021 :-  आधार कार्ड भारतात राहणा-या लोकांसाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. बर्‍याच सरकारी योजनांशी संबंधित असल्याने ते एक महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. त्याचप्रमाणे पॅन कार्ड कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज बनले आहे.

बँक खाती उघडण्यापासून मालमत्ता खरेदी-विक्री, वाहने खरेदी-विक्री, आयकर विवरणपत्र भरणे यापासून इतर अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये याचा उपयोग होतो. आयकर विभाग पॅन कार्ड जारी करते. जवळजवळ प्रत्येक आर्थिक व्यवहारामध्ये 10-अंकी ओळख क्रमांक पॅन कार्डचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

Advertisement

आयकर विभागाने पॅन कार्ड आधारशी जोडणे बंधनकारक केले आहे. पॅन कार्डसुद्धा आपल्या ओळखीचे महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. अशा परिस्थितीत आपण अद्याप पॅनकार्ड आधार कार्डशी जोडलेलं नसेल तर ३० जूननंतर आपल्या समस्या वाढू शकतात.

जर तुम्ही आधार पॅन लिंक केलं असेल तर तुम्ही त्याचं स्टेटस असे तपासा 

Advertisement
 • www.incometaxgov.in या वेबसाईटवर लिंक करावं लागेल. त्यानंतर होम पेजवर असलेल्या सेक्शनमध्ये जाऊन आधार ऑप्शनवर क्लिक करा.
 • लिंक आधार सेक्शनच्या आत ‘Know About Your Aadhaar Pan Linking Status’ वर क्लिक करा. त्यानंतर एक विंडो ओपन होईल. त्या ठिकाणी तुमच्या आधार कार्डाशी आणि पॅन कार्डाशी निगडीत डिटेल्स भरा.
 • एकदा संपूर्ण माहिती टाकल्यानंतर ‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक करा. त्यानंतर तुमचं सध्याचं स्टेटस काय आहे हे दिसून येईल.
 • याशिवाय तुम्हाला तुमचं स्टेटस एसएमएसद्वारेही पाहता येऊ शकतं. तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावरून तुमचा १२ अंकी आधार कार्ड क्रमांक लिहा. त्यानंतर स्पेस देऊन तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाईप करा.
 • यानंतर तो मेसेज 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा. त्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस एसएमएसद्वारे मिळून जाईल.

आपला आधार आणि पॅन कार्ड कसे लिंक करावे?

 1. सर्व प्रथम, आपल्याला प्राप्तिकर विभागाच्या ई-फाइलिंग पोर्टलवर जावे लागेल. यासाठी आपण या लिंक वर क्लिक करू शकता- https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
 2. आता तुम्हाला मुख्यपृष्ठाच्या डाव्या बाजूला जाऊन लिंक आधार पर्याय निवडावा लागेल.
 3. नवीन पेजवर जाताना तुम्हाला तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक द्यावा लागेल.
 4. सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला याची पुष्टी करावी लागेल.
 5. यानंतर तुम्हाला ‘ I agree to validate my aadhaar details with UIDAI’ वर क्लिक करावे लागेल.
 6. आता आपल्यासमोर कॅप्चा असेल.
 7. शेवटी, आपल्याकडे आपला आधार लिंक करण्याचा पर्याय येईल.

 

Advertisement
 • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
 • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup