FD interest rates increase : खुशखबर ! ‘ह्या’ बँकांनी वाढवले FD चे व्याजदर, जाणून घ्या एका क्लिकवर

MHLive24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- बँक ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेषतः जे लोक एफडी करतात त्यांच्यासाठी खास आहे. कारण एकीकडे एफडीचे व्याजदर कमी होत असताना एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.(FD interest rates increase )

म्हणजेच, जर तुम्ही या दोन बँकांपैकी कोणत्याही बँकेत एफडी केली असेल, तर आता एफडी मॅच्युअर झाल्यावर तुम्हाला अधिक रिटर्न मिळेल.

HDFC आणि ICICI या खाजगी क्षेत्रातील प्रमुख बँका आहेत. या बँकांची स्पर्धा आता थेट सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाशी (SBI) आहे.

Advertisement

या बँकांच्या वेगवेगळ्या कालावधीच्या FD वर उपलब्ध व्याजदरांबद्दल आपण या ठिकाणी पाहूया.. याच्या मदतीने तुम्ही स्वतःसाठी एक चांगला पर्याय निवडू शकता.

कोणाला किती परतावा मिळतो?

व्याजदरांमध्ये सुधारणा केल्यानंतर, एचडीएफसी बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 2.50 टक्के ते 5.50 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांच्या FD वर 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3% ते 6.25 टक्के व्याज असते. हे नवीन दर 1 डिसेंबर 2021 पासून लागू झाले आहेत.

Advertisement

यासोबतच ICICI बँकेनेही आपल्या व्याजदरात बदल केला आहे. ICICI बँक 7 दिवस ते 10 वर्षांसाठी 2.5 टक्के ते 5.5 टक्के व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 बेसिक पॉइंट्स (bps) जास्त व्याजदर. दोन्ही बँकांचे दर पाहू या.

एचडीएफसी बँक एफडी दर

एचडीएफसी बँक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर खालील प्रकारे व्याज देते:

Advertisement

7 ते 14 दिवसांसाठी 2.50% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.00%.
15 – 29 दिवसांसाठी 2.50% आणि 3.00%
30 – 45 दिवसांसाठी 3% आणि 3.50%,
61 – 90 दिवसांसाठी 3% आणि 3.50%,
91 दिवस ते 6 महिन्यांसाठी 3.50% आणि 4%
6 महिने आणि 1 दिवस ते 9 महिने – 4.40% आणि 4.90% ,
9 महिने आणि 1 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 4.40% आणि 4.90% ,
1 वर्षासाठी 5.40%,
1 वर्ष आणि एक दिवसापासून 2 वर्षांसाठी 5.15% आणि 5.65%
2 वर्षे आणि एक दिवसापासून 3 वर्षांसाठी 5.65% आणि 4.75%,
3 वर्षे आणि एक दिवसापासून 5 वर्षांसाठी 5.35% आणि 4.85%,
5 वर्षे आणि एक दिवस ते 10 वर्षे 5.50% * आणि 6.25% ज्येष्ठ नागरिकांसाठी.

ICICI बँकेचे मुदत ठेव दर

ICICI बँक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर खालील प्रकारे व्याज देते:

Advertisement

7 ते 14 दिवस = 2.50% – 3.00%
15 ते 29 दिवस = 2.50% – 3.00%
30 दिवस ते 45 दिवस = 3.00% – 3.50%
46 दिवस ते 60 दिवस = 3.00% – 3.50%
61 दिवस ते 90 दिवस = 3.00% – 3.50%
91 दिवस ते 120 दिवस = 3.50% – 4.00%
121 दिवस ते 150 दिवस = 3.50% – 4.00%

151 दिवस ते 184 दिवस = 3.50%- 4.00%
185 दिवस ते 210 दिवस = 4.40% – 4.90%
211 दिवस ते 270 दिवस = 4.40% – 4.90%
271 दिवस ते 289 दिवस = 4.40% – 4.90%
290 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी = 4.40% – 4.90%
1 वर्ष ते 389 दिवस = 4.90% – 5.40%
390 दिवसांपासून ते 15 महिन्यांपेक्षा कमी = 4.90% – 5.40%
15 महिन्यांपासून ते 18 महिन्यांपेक्षा कमी = 4.90% – 5.40%
18 महिने ते 2 वर्षे = 5.00%-5.50%

2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे = 5.20% – 5.70%
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे = 5.40% – 5.90%
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे = 5.60% – 6.30%
5 वर्षे (80C FD) – कमाल 1.50 लाख = 5.40% आणि 5.90%

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker