Home loan interest rates : घर खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! बँकेने वाढवले गृहकर्जाचे व्याजदर; पहा नवीन दर

MHLive24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. कोटक महिंद्रा बँकेने सणाची ऑफर संपताच गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.(Home loan interest rates )

बँकेने गृहकर्जाच्या व्याजदरात ५ बेसिस पॉईंट्स म्हणजेच ०.०५ टक्के वाढ केली आहे. यानंतर आता कोटक महिंद्रा बँकेतील गृहकर्जाचे व्याजदर ६.५५ टक्क्यांपासून सुरू होतील. नवीन गृहकर्ज व्याजदर ९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२१ पर्यंत लागू होतील.

बँकेने दिली ही माहिती

Advertisement

बँकेने यासाठी एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये बँकेने म्हटले आहे की, ‘सप्टेंबरच्या सुरुवातीला कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने वार्षिक 6.50 टक्क्यांपासून गृहकर्जाचे व्याजदर लागू करून सणासुदीच्या हंगामाची सुरुवात केली होती.

ज्या अर्जदारांची कर्जे 8 नोव्हेंबर 2021 पर्यंत बँकेने मंजूर केली आहेत आणि त्यांना पुढील सात दिवसांसाठी म्हणजेच 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत वितरित केले जातील, त्यांच्यासाठी व्याजदर 6.50 टक्के राहतील.

घर खरेदीची उत्तम संधी

Advertisement

अंबुज चंदना, (अध्यक्ष – ग्राहक मालमत्ता, कोटक महिंद्रा बँक) यांनी सांगितले, “अलीकडेच आमच्या विशेष 60 दिवसांच्या सणासुदीच्या हंगामातील ऑफरचे घर खरेदीदारांनी खूप कौतुक केले आहे आणि आम्हाला नवीन प्रकरणे आणि शिल्लक हस्तांतरण या दोन्ही बाबतीत खूप मागणी आहे.

त्यामुळे, 6.55 टक्क्यांच्या नवीन गृहकर्ज दरासह कर्जदारांना चांगला कालावधी देताना आम्हाला आनंद होत आहे. ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घर खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.

ग्राहकांना फायदा होईल

Advertisement

कोटक महिंद्रा बँकेकडून नवीन व्याजदर शिल्लक हस्तांतरण कर्जावर देखील लागू आहे. या व्‍याजदरांच्‍या अंतर्गत कर्ज घेतलेल्‍या कर्जाच्या रकमेवर कोणतीही मर्यादा नाही आणि ती पगारदार आणि स्‍वयं-रोजगार करणार्‍या व्‍यावसायिकांसाठी उपलब्‍ध आहे. म्हणजेच कोणताही पात्र ग्राहक येथे कर्ज घेऊ शकतो. ग्राहकाला मिळणारा अंतिम दर त्याच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असेल.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker