Loan festival of bank : ‘ह्या’ बँकेने सुरु केले लोन फेस्टिवल; अतिशय कमी दरांत मिळणार कर्ज, जाणून घ्या डिटेल्स

MHLive24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- बऱ्याचदा लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यात बऱ्याचदा आर्थिक अडचणी जास्त येतात. आताही जर तुमच्या घरात लग्न किंवा एखादा मोठा कार्यक्रम असेल, ज्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल किंवा तुम्हाला गोल्ड लोन घ्यायचे असेल, तर एक बँक तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आली आहे.(Loan festival of bank)

SVC सहकारी बँकेने कर्ज महोत्सव सुरू केला आहे. या कर्ज महोत्सवांतर्गत ग्राहकांना आकर्षक दरात कर्ज दिले जाणार आहे. यामध्ये वाहन कर्ज, सुवर्ण कर्ज आणि डॉक्टरांसाठी विशेष कर्ज यांचा समावेश आहे.

बँकेने जारी केले स्टेटमेंट

Advertisement

पीटीआयच्या वृत्तानुसार, बँकेने आपल्या ग्राहकांना सुविधा देण्यासाठी हा कर्ज महोत्सव सुरू केला आहे. या महोत्सवांतर्गत बँक किमान 6.45 टक्के दराने गृहकर्ज सुविधाही उपलब्ध करून देत आहे. बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, SVC महा कर्ज उत्सवांतर्गत ग्राहकांना विविध प्रकारची कर्जे आकर्षक दरात दिली जात आहेत.

हा उत्सव किती दिवस चालणार

हा उत्सव आणि त्याअंतर्गत लोन 31 डिसेंबर 2021 पर्यंत 11 राज्यांतील बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असेल असे बँकेने म्हटले आहे. या वेळी गृहकर्जाचा व्याजदर 6.45 टक्के करण्यात आल्याची माहिती बँकेने दिली. याशिवाय वाहन कर्जावर दरवर्षी 7 टक्के आणि सुवर्ण कर्जावर 8.50 टक्के दराने कर्ज दिले जाणार आहे. याशिवाय मालमत्ता आणि डॉक्टरांच्या कर्जावर 8.75 टक्के दराने कर्ज दिले जाणार आहे.

Advertisement

कर्ज कसे घ्यावे

तुम्हालाही SVC सहकारी बँकेने सुरू केलेल्या कर्ज महोत्सवाअंतर्गत कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही SVC Care ला 18003132120 वर कॉल करू शकता. याशिवाय तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊनही कर्जासाठी अर्ज करू शकता.

एसबीआयने कर्ज महाग केले

Advertisement

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. SBI ने बेस रेट आणि प्राइम लेंडिंग 10-10 बेसिस पॉइंट्सने वाढवले आहे. आता बँकेचा बेस रेट 7.45 टक्क्यांवरून 7.55 टक्के झाला आहे आणि प्राइम लेंडिंग रेट 12.20 टक्क्यांवरून 12.30 टक्के झाला आहे. हे नवे दर 15 डिसेंबरपासून लागू झाले आहेत.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker