Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

बाबा रामदेवांचे मोठे वक्तव्य; ‘मला हवे असते तर मी पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होऊ शकलो असतो, पण…’

0 4

MHLive24 टीम, 29 जून 2021 :- एका मुलाखती दरम्यान योगगुरु रामदेव यांनी सांगितले होते की, जीवनात जे काही मिळवले आहे ते स्वतःच्या हिमतीने मिळवले आहे. कोणाच्या कृपेने ते मिळालं नाही. कॉर्पोरेट किंवा कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा व्यक्तीनेही दया दाखविल्यामुळे काहीही मिळवले नाही.

रामदेव बाबा म्हणाले होते की, ‘याउलट या लोकांना देण्याचे काम मी केले आहे.’ रामदेव बाबा म्हणाले की त्यांना हवे असते तर ते देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होऊ शकले असते. भविष्यात देखील ते होऊ शकतात परंतु त्यांना ते पद नको आहे. ते त्यासाठी बनलेले नाहीत. ते योगासाठी बनलेले आहेत.

Advertisement

योगगुरू बाबा रामदेव यांनी कोविड -19 मधील उपचारांवरील अ‍ॅलोपॅथीबद्दल केलेल्या टीकेबद्दल वेगवेगळ्या राज्यात खटला दाखल केल्यानंतर त्या कारवायांवर बंदी लावावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. रामदेव बाबा यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दाखल केलेल्या एफआयआरमध्ये दंडात्मक कारवाईपासून संरक्षणही मागितले आहे.

रामदेव बाबा यांनी पाटणा आणि रायपूर शाखांमध्ये आयएमएने नोंदवलेल्या एफआयआरच्या कारवाईवर आणि एफआयआर दिल्ली न्यायालयात हस्तांतरित करण्यास स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे.

Advertisement

आयएमएने गेल्या महिन्यात रामदेव बाबा यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती आणि अ‍ॅलोपॅथीला “बेईमान आणि चुकीच्या पद्धतीने सादर केल्याने” एफआयआर नोंदविण्याची मागणी केली होती.

आयपी एस्टेट पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत, सर्वोच्च वैद्यकीय मंडळाने म्हटले आहे की रामदेव यांनी कोविड रूग्णांच्या इलाजबाबतीत प्रस्थापित आणि मंजूर पद्धती आणि ड्रग्जद्वारे उपचारांबद्दल जाणूनबुजून खोटी, निराधार व द्वेषयुक्त माहिती पसरविली आहे. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये पोलिसांनी आयएमएच्या छत्तीसगड युनिटने दिलेल्या तक्रारीवरून योगगुरू रामदेव बाबा यांविरूद्ध एफआयआर नोंदविला होता.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit