Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

राहुल गांधी यांच्या फोन टॅपिंगमध्ये अझरबैजान, रवांडा! ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उडविली भाजपची खिल्ली; ट्वीटमध्ये उपहासात्मक टीका

0 80

MHLive24 टीम, 22 जुलै 2021 :- काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा फोन टॅप करण्यात अझरबैजान आणि रवांडाच्या सरकारांचा हात असल्याचा उपरोधात्मक आरोप करत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांची खिल्ली उडवली.

कर्नाटक सरकार पाडण्यात मोरोक्काचा हात ! :- राऊत यांनी पेगॅसस मालवेअरच्या माध्यमातून हेरगिरीप्रकरणी ट्वीट करत मोदी सरकारची खिल्ली उडवली. यात त्यांनी त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “माझी हळूहळू खात्री पटत चालली आहे, की अझरबैजान आणि रवांडाच्या सरकारांनी राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांचे फोन टॅप केले होते.”

Advertisement

राऊत यांनी कर्नाटकमधील सरकार पाडण्याच्या प्रकारावरूनही भाजपवर निशाणा साधला. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी कर्नाटकात कुमारस्वामी सरकार पाडण्यात मोरोक्कोचा हात होता, असं म्हणत भाजपवर निशाणा साधला. राऊत यांनी आपल्या ट्विटच्या शेवटी पेगासस हा हॅशटॅगही वापरला.

काँग्रेसचा मोठा आरोप :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील फोन टॅपिंग करूनच कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यात आलं. सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारने फोन टॅपिंगचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. फोन टॅपिंगचा दुरुपयोग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

केंद्र सरकारने याचा गैरवापर केला. अनेकांचे फोन टॅप केले. ही गंभीर बाब आहे. संवैधानिक व्यवस्थेविरोधातील हे कृत्य आहे. त्यामुळे संबंधितांनी राजीनामा द्यायला हवा. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement