Apple launches glass phone : Apple बाजारात आणणार आहे काचेचा फोन; पाहून तुम्ही म्हणाल मोबाईल आहे कि काचेचा तुकडा

MHLive24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- Apple चे फ्लॅगशिप स्मार्टफोन, iPhones जगातील सर्वाधिक प्रीमियम फोन्सच्या यादीत येतात आणि प्रत्येक नवीन मॉडेलसोबत काहीतरी नवीन घेऊन येतात.

बऱ्याच दिवसांपासून बाजारात बातम्या येत होत्या की Apple सध्या काचेच्या iPhone वर काम करत आहे. या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. चला जाणून घेऊयात त्याबद्दल

काचेचा आयफोन

Advertisement

Apple ने ऑल-ग्लास आयफोनसाठी यूएस पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिसकडे पेटंट दाखल केले आहे आणि ऑल-ग्लास ऍपल वॉच आणि ऑल-ग्लास मॅक प्रो टॉवरबद्दल देखील बोलले आहे. सदर फोन सहा बाजूंनी काचेच्या आच्छादनांनी वेढलेला आहे. या पेटंटमध्ये आणखी काय सांगण्यात आले आहे ते जाणून घेऊया.

पेटंट मध्ये आणखी काय आहे 

ऍपलच्या मते, पेटंटची भाषा खूपच अवघड आहे, परंतु संपूर्ण पेटंट पाहता असे म्हणता येईल की हा स्मार्टफोन एक काचेचा बॉक्स आहे जो आयफोनच्या फीचर्स सह येतो. पेटंटनुसार या फोनमध्ये दोन ग्लास मेंबर असतील. फोनच्या ग्लास रीजन्स मध्ये ‘डीफॉर्मेशन्स’ चा शोध लावण्यासाठी हा फोन एक खास फोर्स-सेन्सिंग सिस्टम सह येऊ शकतो.

Advertisement

त्याचा डिस्प्ले असा असेल की आरपार दिसेल

Apple एका वर्षात अनेक पेटंट फाइल करते, परंतु प्रत्येक पेटंटवर काम करून ते बाजारात लॉन्च करतेच असे नाही. त्यामुळे अॅपल खरोखरच काचेच्या आयफोनवर काम करेल की नाही आणि तो लॉन्च होईल की नाही हे सध्याच सांगता येणार नाही. आत्तापर्यंत, Apple च्या ग्लास वॉच आणि मॅक प्रो टॉवरबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker