तुमच्याकडे असेल ‘हा’ अँड्रॉइड स्मार्टफोन तर ‘ह्या’ तारखेपासून तो कोणत्याही कामाचा राहणार नाही

MHLive24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  आपल्या सर्वांकडे आज एक स्मार्टफोन आहे जो आपण आपल्या सर्व कामासाठी आणि मनोरंजनासाठी वापरतो. आपण फोन नवीन तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांसह अपडेटेड ठेवण्यासाठी, फोन आणि फोनमध्ये डाउनलोड केलेले अॅप्स वेळोवेळी अपडेट करत राहतो. ( Android smartphone will not work )

आता आलेल्या एका रिपोर्टनुसार, अनेक अॅप्स काही अँड्रॉइड स्मार्टफोनवर काम करणे बंद करतील, ज्यामुळे वापरकर्त्याचा फोन काही उपयोगाचा राहणार नाही.

काय आहे नेमके प्रकरण ? :- 9to5Google च्या अहवालानुसार, ते सर्व Android फोन वापरकर्ते, जे Android 2.3.7 किंवा त्यापेक्षा कमी वर्जन वापरत असतील तर ते , 27 सप्टेंबर 2021 पासून त्यांच्या फोनवर Google अॅप्स वापरू शकणार नाहीत. गुगलने या श्रेणीच्या सर्व वापरकर्त्यांना एक मेल पाठवला आहे, ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की ज्या लोकांच्या फोनमध्ये अँड्रॉइड 2.3.7 किंवा पूर्वीचे वर्जन आहेत ते Google Apps चे साइन-इन सपोर्ट गमावतील.

Advertisement

आता काय होईल ? :- गुगलने पाठवलेल्या मेलमध्ये असे लिहिले आहे की, 27 सप्टेंबरनंतर जर अँड्रॉइड 2.3.7 किंवा त्यापेक्षा कमी वर्जन वापरणारा यूजर जीमेल आणि यूट्यूब सारख्या कोणत्याही गुगल सपोर्ट अॅपमध्ये साइन इन करण्याचा प्रयत्न करत असेल तर फोनच्या स्क्रीनवर,‘Username or password error’ असे लिहिले जाईल. या अॅप्सच्या वेब वर्जन देखील कार्य करणार नाहीत.

जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमचा फोन फॅक्टरी रीसेट करून किंवा Google वर नवीन खाते तयार करून तुमच्या फोनवर हे अॅप्स वापरू शकाल, तर अशा प्रकारे तुमच्या फोनवर अॅप्स चालणार नाहीत. अॅप अनइंस्टॉल करणे आणि पुन्हा डाउनलोड करणे देखील निरुपयोगी होईल. ही समस्या टाळण्याचे दोनच मार्ग आहेत, एकतर तुमचा फोन अपडेट करा किंवा नवीन स्मार्टफोन खरेदी करा.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker