आणि आरोपी म्हणाला होय.! मीच माझ्या पत्नीच्या डोक्यात दंडा मारुन हत्या केली

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील चैतन्यपूर येथे पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली होती. मात्र, पत्नीचा मृत्यु गाईने लाथ मारल्यामुळे झाल्याचे सागण्यात आले होते.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. माझ्या मुलीची हत्या करण्यात आली असून तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीनंतर पोलिसांनी आरोपी भगवान भाऊ हुलवळे (रा. चैतन्यपूर, ता. अकोले) यांच्यावर कलम 302 कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान पोलिस चौकशी दरम्यान नाही-नाही म्हणणार्या आरोपीने काल आपल्या गुन्ह्याची कबुली देत होय! मीच माझ्या पत्नीचा खून केल्याची हकीकत सांगितली आहे.
संशयीत घटनाक्रम त्यास विचारला असता उत्तरे देताना त्यात संदिग्धता आढळून आली. त्यामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावर आधिक बळावला. नंतर जेव्हा काही सबळ पुरावे हाती आले. तेव्हा पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखविताच भगवानाला वाचा फुटली
पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखविताच भगवानाला वाचा फुटली. तो पोपटासारखा बोलू लागला. होय.! मीच माझ्या पत्नीच्या डोक्यात दंडा मारुन तिची हत्या केली आहे.
हा प्रकार दडविण्यासाठी असा बनाव केला की, ती गाईच्या गोठ्यात दुध काढण्यासाठी गेली असता गाईने लाथ मारल्यानंतर ती मयत झाली. खरतर आमच्यात रोज वाद होत होते. वैचारिक मतभेद होेत असल्यामुळे मी वैतागलो होतो. त्यामुळे मी प्रकार केल्याची कबुली आरोपीने दिली. त्यामुळे या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.