Motor Vehicle Act : मोटार वाहन कायद्यात सुधारणा; हे नवे नियम एकदा वाचाच…

MHLive24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- मोटार वाहन कायद्यात राज्य सरकारने नवीन सुधारणा केल्या आहेत. गुरुवारी याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. विविध वाहतूक गुन्ह्यांसाठी दंडात वाढ करण्यात आली आहे. नवीन नियमामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांना चाप बसणार आहे.(Motor Vehicle Act)

दुचाकीवरील ट्रिपल सीटसाठीचा दंड 200 रुपयांवरून थेट 1000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. विना हेल्मेट प्रवास केल्यावर पहिल्या वेळी 500 रुपये दंड असेल, परंतु दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास 1,500 रुपये दंड असेल.

वाहन चालवताना मोबाईलवर बोलण्याचा दंड 200 रुपये वरून 500 रुपये करण्यात आला आहे. हॉर्न वाजवल्यास 500 रुपयांवरून 1000 रुपये दंड करण्यात आला आहे. फॅन्सी नंबर प्लेटसाठी 1,000 रुपये दंड होता, तर सुधारित दंड पहिल्या उल्लंघनासाठी 500 रुपये आणि त्यानंतरच्या उल्लंघनासाठी 1500 रुपये आहे.

Advertisement

हायस्पीड ड्रायव्हिंगसाठी आता 5000 रुपये आणि परमिटशिवाय गाडी चालवल्यास 10,000 रुपये दंड आकारला जाईल. यामुळे सुरक्षा तर सुधारेलच पण रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे एका वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit
Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker