Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

अंबानी यांची मोठी घोषणा; ‘ह्या’ महिन्यात जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट फोन आणणार, वाचा सविस्तर माहिती

0 3

MHLive24 टीम, 24 जून 2021 :- रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यातील एक म्हणजे जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट फोन लॉन्च करणे. मुकेश अंबानी यांनी एजीएम दरम्यान सांगितले की, हा स्मार्ट फोन गणेश चतुर्थीच्या दिवशी सप्टेंबरमध्ये बाजारात आणला जाईल.

हा जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट मोबाइल फोन असेल असा दावा मुकेश अंबानी यांनी केला आहे. त्यांच्या मते, हे प्रथम भारतात लाँच केले जाईल, परंतु त्यानंतर जगातील इतर देशांमध्येही त्याची विक्री होईल. तथापि, जिओफोन-नेक्स्टच्या किंमती जाहीर केल्या गेलेल्या नाहीत.

Advertisement

गुगलसह मिळून होणार काम :- अँड्रॉईडवर चालणारा हा स्मार्टफोन गुगल आणि जिओ यांनी मिळून तयार केला आहे. या वर्षी १० सप्टेंबर रोजी हा फोन उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. “देशातील सर्वात पहिली 5G सेवा सुरूव करण्यासाठी कंपनी तयार आहे. कंपनीनं नुकतीच मुंबईत 1Gbps ची यशस्वी चाचणी घेतली आहे.

याशिवाय कंपनीला सरकारकडून चाचणीसाठी स्पेक्ट्रम आणि मंजुरीदेखील मिळाल्या आहेत,” असं अंबानी यांनी स्पष्ट केलं. “जिओ त्वरित 5G सेवा अपग्रेड करण्याच्या स्थितीत आहे.

Advertisement

5G इकोसिस्टम तयार करण्यासाठी आम्ही जागतिक पातळीवरील पार्टनर्ससोबतही काम करत आहोत. जिओ केवळ भारताला 2G मुक्त नाही, तर 5G युक्त बनवण्याचा प्रयत्न करत आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जियोफोन-नेक्स्ट स्मार्ट फोनची विशेषत :- त्यात नवीन स्मार्टफोन जिओ आणि गुगलची फीचर्स आणि अ‍ॅप्स टाकली जातील. ही एक Android आधारित स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम आहे जिओ आणि Google यांनी एकत्र विकसित केली आहे.

Advertisement

भारतीय बाजारपेठेसाठी खास तयार केलेल्या जिओफोन-नेक्स्ट स्मार्टफोनवरही गुगल प्ले स्टोअर वरून अ‍ॅप्स डाउनलोड करण्यात सक्षम होतील. स्मार्टफोनला खूप चांगला कॅमेरा आणि अँड्रॉइड अपडेटही मिळेल.

सुंदर पिचाई यांनीही दिली माहिती :- रिलायन्सच्या एजीएम दरम्यान गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही या स्मार्टफोनविषयी माहिती दिली. ते म्हणाले की गूगल आणि जिओच्या सहकार्याने बनवलेल्या या नवीन आणि परवडणार्‍या जिओ स्मार्टफोनबरोबर नवी भागीदारी सुरू झाली आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit