अजित पवार यांचे खबरदारी घेण्याचे आदेश

MHLive24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी सर्वांनी सतर्कता बाळगावी, आपल्याला गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबतच कोरोनाच्या चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना त्याचा विकासकामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपाययोजनांचा आढावा :- बारामतीमधील विकासकामांच्या पाहणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्या वेळी ते बोलत होते.

समन्वय साधून काम करावे :- पवार म्हणाले, की बारामती तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली, तरी सर्वांनी सर्तकता ठेवावी, गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबतच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा. कोरोनाच्या संभाव्य तिस-या या लाटेशी लढताना त्याचा विकासकामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

Advertisement

सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पॉझिटिव्हीटी रेट वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. नागरिकांनी मास्क वापरावा, कोरोना प्रादुभार्वाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अशा सूचनाही या वेळी पवार यांनी दिल्या.

विकासकामांची पाहणी :- या बैठकीपूर्वी पवार यांनी क-हा नदी सुधार प्रकल्प, अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालयाची नवीन इमारत, परकाळे बंगला येथील कॅनलवरील रोड व सुशोभीकरण, क्रीडा संकुल, देसाई इस्टेट येथील रस्त्याची पाहणी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन विश्रामगृह इत्यादी कामाची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिका-यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना देऊन विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना दिल्या.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker