Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

खासदार सुळे यांच्यासमोरच अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा

0 0

MHLive24 टीम, 28 जून 2021 :-  पुण्यातील आंबील ओढयानजीक आंदोलन करणा-या महिलांना भेट देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी पोहोचल्या.

त्यांनी खाली बसून आंदोलक महिलांसोबत सुळे यांनी संवाद साधला; मात्र त्याचवेळी वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुळे यांच्या समोरच अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. “मुर्दाबाद मुर्दाबाद अजित पवार मुर्दाबाद” अशा घोषणा चक्क सुळे यांच्या समोरच दिल्या जात होत्या.

Advertisement

पुण्यातील आंबील ओढ्यातील काही नागरिकांची घरं पाडल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने स्थानिकांच्या मदतीने आंदोलन केलं. आंबील ओढ्यातील नागरिकांनी महापालिकेच्या बाहेर ठिय्या दिला.

पाडलेली घरं बांधून देण्याची मागणी या वेळी आंदोलकांनी केली. वंचित बहुजन आघाडी आणि आंबील ओढ्यातील महिला आंदोलनात सहभागी झाल्या. महापालिकेविरोधात नागरिकांनी घोषणाबाजी केली.

Advertisement

राजकारण करू नये :- या वेळी सुळे यांनी याप्रकरणात कोणतंही राजकारण करू नये, असं आवाहन केलं. त्या म्हणाल्या, ”मी इथे राजकारण करण्यासाठी आले नाही. हा विषय संवेदनशीलपणे सोडवणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणीही राजकारण आडवं न आणता हा प्रश्न मार्गी लावावा”

आंबील ओढ्यावर कारवाई :- आंबील ओढ्यावरील घरांवर पुणे महापालिकेने 24 जून रोजी कारवाई केली होती. पुण्यातील आंबील ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले होते. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला होता.

Advertisement

तसेच या वेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. या वेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली. त्यानंतर काही घरं पाडल्यानंतर या पाडकामाला न्यायालयाने स्थगिती दिली. शिवाय नगरसविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुढील आदेशापर्यंत पाडकाम थांबवण्याचे निर्देश दिले.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement