Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

अजितदादांच्या करडेपणाला प्रेमाची झालर

0 145

MHLive24 टीम, 22 जुलै 2021 :-  उपमुख्यमंत्री अजित पवार हे नुसतं नाव ऐकलं, तरी करड्या शिस्तीच्या पवारांची करारी छबी डोळ्यासमोर येते. कडक खर्जातला जरब बसविणारा आवाज कानात घुमतो. त्यांची तीक्ष्ण नजर अगदी थेट आर-पार गेल्याचा आभास होतो; मात्र या कडकशिस्तीच्या अजितदादांच्या ह्रदयातही मायेचा, आपुलीचा झरा आहे.

या आपुलकीची, आपलेपणाची प्रचिती उपमुख्यमंत्री कार्यालयातल्या सर्व स्टाफने अनुभवली. निमित्त होतं, वाढदिवसांच्या शुभेच्छांचं. अंतरीच्या जिव्हाळ्याचं.

Advertisement

सामाजिक अंतर पाळून शुभेच्छांचा स्वीकार :- पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त, उपमुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपुलकीच्या शुभेच्छा दिल्या. करड्या शिस्तीच्या अजित पवार यांनी कार्यालयातील प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याला स्वतंत्रपणे वेळ देऊन शुभेच्छा स्वीकारल्या. प्रत्येक कर्मचाऱ्याला अजित पवार यांच्यासोबत वैयक्तिक फोटो काढण्याची संधीही देण्यात आली.

कामाला प्रतिष्ठा :- पवार यांच्या कार्यालयात कामे तात्काळ मार्गी लागतात, कारण तिथं टीमवर्क म्हणून काम केलं जातं. अधिकाऱ्यांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या कामाला तिथं प्रतिष्ठा आहे.

Advertisement

कार्यालयासाठी प्रत्येक जण आणि त्याचं काम महत्वाचं आहे याची प्रचिती अजित पवार यांच्या वागणुकीतून सातत्यानं येते. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमात अजितदादांनी आपल्या स्टाफशी केलेल्या प्रेमाच्या संवादातून, वागणुकीतून त्याची अनुभूती पून्हा एकदा आली.

का रेंगाळत होते कर्मचारी ? :- 22 जुलै रोजी अजित पवार यांचा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोणीही प्रत्यक्ष येऊ नये, पुष्पगुच्छ पाठवू नये, गर्दी जमवू नये, असं जाहीर आवाहन त्यांनी केलं.

Advertisement

त्यामुळं त्यांच्या अनेक चाहत्यांची, कार्यकर्त्यांची निराशा झाली. या पार्श्वभूमीवर दिवसभराचं कार्यालयीन कामकाज संपताना मंत्रालयातल्या उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात पवार यांच्या सर्व बैठका, नियोजित भेटी झाल्यावर कार्यालयातले कर्मचारी नेहमीपेक्षा जास्तच वेळ उगीचच रेंगाळत असल्याचं अजित पवार यांच्या लक्षात आलं.

प्रेमळ दम देत शुभेच्छांचा स्वीकार :- काय आहे? असं नेहमीच्या खास पवार शैलीत त्यांनी विचारलं. त्यावर कुणीतरी अगदी भीतभीतच काही नाही, शुभेच्छा द्यायच्यात, असं धाडस करून सांगितलं. त्याला सावररून घेत तिथं उपस्थित असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयातल्या स्टाफला आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्यात असं सांगितलं. त्यावर ठीक आहे, चला असा प्रेमळ दम त्यांनी भरला.

Advertisement

आपुलकीचा आपलेपणाचा सोहळा :- मग सुरू झाला ह्रद्य सोहळा. आपुलकीचा आपलेपणाचा. कार्यालयातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडून अगदी वैयक्तिक स्वरुपाच्या शुभेच्छांचा स्वीकार करत अजितदादांनी प्रत्येकासोबत फोटो सेशन केलं; मात्र या सोहळ्याचं वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे उपमुख्यमंत्री कार्यालयातल्या अगदी चतुर्थश्रेणी, कंत्राटी कर्मचाऱ्यांपासून ते अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना एकच न्याय, कोणी मोठा नाही-कोणी छोटा नाही. प्रत्येकानं अगदी रांगेत येऊनच (सोशल डिस्टन्सिंग पाळत) शुभेच्छा दिल्या, त्या त्यांनी तितक्याच आपलेपणाने स्वीकारल्याही.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement