Free air travel : आता फ्रीमध्ये करा विमानाने प्रवास ! ही एअरलाइन देत आहे ‘फ्री सीट आणि फ्री जेवण’

MHLive24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- जर तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना महामारीच्या मध्यंतरीच्या कालखंडानंतर आता सर्व काही सामान्य होत चालले आहे. त्यामुळे आता विमान कंपन्यांनी पुन्हा ऑफर देण्यास सुरुवात केली आहे.(Free air travel)

याच अनुशंघाने GoFirst ने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोफत प्रवास आणि मोफत भोजनची ऑफर दिली आहे. तुम्ही या ऑफरचा कसा फायदा घेऊ शकता ते जाणून घ्या.

गो फर्स्ट देत आहे शानदार ऑफर

Advertisement

खाजगी विमान कंपनी GoFirst ने बेंगळुरूहून निवडक फ्लाइटमध्ये ‘मोफत सीट आणि जेवण’ ऑफर केले आहे. तुम्हीही बंगलोरमध्ये राहत असाल किंवा येथून कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम ऑफर आहे. GoFirst च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही ‘फ्री सीट्स आणि फ्री मील्स’ बद्दल तपशीलवार माहिती मिळवू शकता.

ऑफर काय आहे ?

GoFirst Airline ने लिहिले, ‘आम्ही बेंगळुरूहून देशभरातील विविध स्थळांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष ऑफर सादर करत आहोत! आता बंगलोरहून उड्डाण करताना आलिशान प्रवासाचा अनुभव घ्या. या विशेष ऑफर अंतर्गत, कंपनी बंगळुरूहून मुंबई, दिल्ली, रांची, वाराणसी, कोलकाता, लखनौ आणि पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना मोफत सीट आणि मोफत जेवण देत आहे.

Advertisement

कंपनीच्या प्रमोशन साठी विशेष ऑफर

देशातील देशांतर्गत उड्डाणे करणाऱ्या प्रवाशांना स्वस्त उड्डाणे उपलब्ध करून देणाऱ्या GoFirst या एअरलाइन कंपनीने www.flygofirst.com या वेबसाइटवर ‘फ्री सीट आणि फ्री फूड’ ऑफरचे तपशील शेअर केले आहेत.

ही ऑफर 16 डिसेंबर ते 10 जानेवारी 2022 पर्यंतच उपलब्ध आहे. वास्तविक, GoFirst एअरलाइन ही खास ऑफर बेंगळुरू फ्लाइट्सच्या प्रमोशन साठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देत आहे.

Advertisement

अटी आणि नियम लागू

GoFirst एअरलाइनने म्हटले आहे की ही ऑफर non-transferable असेल. तुम्ही एकदा या ऑफर अंतर्गत बुकिंग केले की, ते इतर कोणाला ट्रान्सफर करता येणार नाही. हे तिकीट हस्तांतरणीय नाही किंवा तिकीट रद्द केल्यावर परतावा दिला जाणार नाही. इतर कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही वेबसाइट तपासू शकता.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker