अहमदनगर : ‘त्या’ १४ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

जामखेड : टुरीस्ट व्हिजा असताना देखील जामखेड येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन १४ जणांनी धार्मिक प्रचार केला तसेच व्हिजामध्ये दिलेल्या अटींचे व जिल्हा अधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी. १० परदेशी व ४ परराज्यातील अशा एकूण चौदा नागरिकांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये आरोपी कोकन कोडीओ गॅस्टोन रा.आयव्हरी कोस्ट, कोने पेफीगोऊ हमीद (रा. आयव्हरी कोस्ट), किटा मनाडो (रा.आयव्हरी कोस्ट), कोमे ॲटोमो कपले मॅथीस (रा. आयव्हरी कोस्ट),
टोरे बकारी (रा.आयव्हरी कोस्ट), राशीद सईदी रा. टांझानिया, माया सुलेमानी ॲथोमनी (रा.टांझानिया), अब्दल्ला सुलीशा सईदी (रा.टांझानिया), हैदरनीया अब्दुल नासीर (रा. इराण), डोमबीया मोरी (रा.आयव्हरी कोस्ट),
पांचाभाई अब्दुल रहीम (रा.गुजरात), मोहमद अली अमिन (रा.मुंबई), मोहमद शाकीर (रा. तामिळनाडू), शेख अल अमीन (रा.तामिळनाडू) अशा १४ जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.१४ मार्च रोजी १० परदेशी व ४ परराज्यातील नागरिक असे एकूण १४ जण नगर जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रमासाठी दाखल झाले होते.
ते जामखेड येथे जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करून धार्मिक कार्यक्रम करत होते. तसेच शहरातील अनेक नागरिक यांच्या संपर्कात आले होते.
१४ पैकी दोघांना कोरोनाची लागण झाली तर चार स्थानिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली यांच्यामुळेच कोरोना जामखेडमध्ये आला. अशी भावना तालुक्यातील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.