राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला होता. नातेवाईक असलेल्या तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी खुलासा केला असून त्यांचा खुलासा सर्वांच्याच भुवया उंचावणार आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज एका महिलेने दिला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी सांगितले.
मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत तिने ही माहिती दिली आहे.
धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट पुढीलप्रमाणे :-