Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

फायद्याची गोष्ट : प्रॉपर्टी घेताय ? महिलांच्या नावावर घेतल्यास मिळतील फायदे

0 4

MHLive24 टीम, 05 जुलै 2021 :- महिलांना नोकरी, उद्योगधंदा करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक क्षेत्रात काही खास सुविधा देण्यात येतात. यासह इन्कम टॅक्समध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांना काही फायदे मिळतात. तसेच महिलांच्या नावावर प्रॉपर्टी, कर्ज घेण्याचेही फायदे आहेत. उदा. कर वाचवण्याच्या बाबतीत, स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त कर वाचवू शकतात, त्यासाठी थोडेसे लक्ष देण्याची गरज आहे.

होम लोनवर मिळते सूट :- महिलांना घरासाठी कर्ज कमी दराने मिळते, त्या तुलनेत पुरुषांना आधी व्याज चुकवावे लागते. स्टेट बँक महिलांना होम लोनवर 0.05 टक्के अर्थात 5 पॉईंटची सूट देते. मात्र हा फायदा घेण्यासाठी ज्या घराची खरेदी केली जाणार आहे, ते घर महिलेचे नावावर असणे ही एकच अट आहे.

Advertisement

स्टॅम्प ड्यूटीमध्ये सूट :- काही राज्यात महिलेच्या नावावर असणाऱ्या संपत्तीकॅगे रजिस्ट्रेशन करताना स्टॅम्प ड्यूटीमध्ये सूट देण्यात येते. दिल्ली सरकारच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांना प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनसाठी 6 टक्के स्टॅम्प ड्यूटी तर महिलांना फक्त 4 टक्के स्टॅम्प ड्यूटी द्यावी लागते.

प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट :- काही महानगरपालिका देखील महिलांना मालमत्ता करात सूट देतात. येथे देखील मालमत्ता कराचा दर वेगवेगळ्या महानगरपालिकेत बदलू शकतो. अशा परिस्थितीत आपणास एकदा प्रॉपर्टी टॅक्सचा दर तपासून घ्यावा लागेल की तुमच्या राज्यात प्रॉपर्टी टॅक्स कोणत्या दराने आकारला जातो. तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की मालमत्ता देखील महिलेच्या नावे नोंदविल्यासच महिलांना मालमत्ता कराचा लाभ मिळेल.

Advertisement

पुरुषांइतकीच आहे टॅक्स सूट मर्यादा :- 2011-12 या आर्थिक वर्षापर्यंत महिलांना पुरुषांपेक्षा करात सूट जास्त मिळत असे, परंतु 2012-13 पासून ते पुरुषांसारखेच आहे. याअंतर्गत महिलांना अडीच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करात सूट मिळते. त्याच बरोबर जर वर्षाचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर उर्वरित अडीच लाखांनाही कर सवलत मिळते, म्हणजेच संपूर्ण 5 लाख करमुक्त आहेत. तथापि, हा नियम केवळ महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठीही आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement