Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

कौतुकास्पद! प्रसिद्ध डाबर कंपनीच्या एक छोटासा कागद हटवण्याच्या निर्णयामुळे वर्षाला होणार 150 टन कागदाची बचत; वाचा काय आहे प्रकरण

0 2

MHLive24 टीम, 23 जून 2021 :- एफएमसीजी कंपनी डाबरने आपल्या टूथपेस्टसाठी पेपर पॅकेजिंग पासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाऊल उचलणारी डाबर ही पहिली कंपनी आहे.

डाबर इंडिया आपल्या टूथपेस्ट ब्रँड डाबर रेड पेस्टची बाह्य पेपर पॅकेजिंग (कार्टन) हटवण्याच्या दिशेने काम करत आहे. रिलायन्स रिटेलच्या सहकार्याने कंपनी प्रमुख मॉडर्न ट्रेड आउटलेट्समध्ये या दिशेने प्रयोग राबवत आहे.

Advertisement

डाबरचे उपाध्यक्ष (मार्केटींग-पर्सनल केअर) राजीव जॉन म्हणतात की डाबर टूथपेस्टवरील पेपर पॅकेजिंगवरील ग्राहकांच्या अभिप्रायाच्या उत्तरार्थ हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. डाबरच्या या कृत्यामुळे वर्षाकाठी 150 टन कागद वाचण्याची शक्यता आहे.

खेड्यांसाठी लो यूनिट प्राइस पॅक :- याशिवाय डाबर ग्रामीण भारतासाठी नॉन-कार्टन लो युनिट प्राइस पॅकदेखील बाजारात आणत आहे. यापूर्वी, युनिलिव्हर सारख्या कंपन्यांनी डव्ह साबणाच्या बॉक्समधून प्लास्टिकचा लेयर काढून टाकणे आणि पॉन्ड्स टैल्क च्या पॅकेजिंगमध्ये सिंगल यूज प्लास्टिक कमी करणे यासारखी पावले उचलली होती.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement