अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

MHLive24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  टीव्ही इंडस्ट्रीचा मोठा चेहरा आणि बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला यांचे निधन झाले आहे. मुंबईतील कूपर हॉस्पिटलने सिद्धार्थ शुक्लाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषध खाल्ले होते पण त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने नंतर पुष्टी केली.

टीव्ही इंडस्ट्रीचे मोठे नाव सिद्धार्थ शुक्ला यांनी बिग बॉस या रिअॅलिटी शोचा 13 वा सीझन जिंकला, याशिवाय त्याने खतरों के खिलाडीचा सातवा सीझनही जिंकला. बालिका वधू या मालिकेतून सिद्धार्थ शुक्लाने देशातील प्रत्येक घरात आपला ठसा उमटवला.

Advertisement

12 डिसेंबर 1980 रोजी मुंबईत जन्मलेल्या सिद्धार्थ शुक्लाने एक मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 2004 मध्ये त्यांनी टीव्हीद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 2008 मध्ये, तो बाबुल का आंगन छोटे ना नावाच्या टीव्ही मालिकेत दिसला, पण त्याची खरी ओळख बालिका वधू या मालिकेतून झाली, जी त्याला घरोघरी घेऊन गेली.

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये यश मिळाल्यानंतर सिद्धार्थ शुक्ला देखील बॉलिवूडकडे वळला. तो 2014 मध्ये हम्प्टी शर्मा की दुल्हनिया चित्रपटात दिसला. त्याच वर्षी त्याची ब्रोकन बट ब्युटिफुल नावाची वेब सीरिज आली, जी बरीच गाजली होती. मध्यंतरी युट्युब वर आलेल्या एका पॉप्युलर गाण्यामध्ये देखील सिद्धार्थ शुक्ला झळकला होता.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker