Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

डान्सबार नडले; चार अधिका-यांवर कारवाई

0 188

MHLive24 टीम, 22 जुलै 2021 :-  शहरातील नौपाडा आणि वर्तकनगर येथील तीन डान्स बार पहाटेपर्यंत सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कारवाईचे आदेश दिले. नौपाडा आणि वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.

उत्पादन शुल्कचे चार अधिकारी निलंबित

कोविडसंदर्भातील निर्बंध लागू असताना १९ जुलैला ठाणे शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये उशिरापर्यंत छुप्या पद्धतीने डान्स बार सुरू असल्याच्या घटनेची राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी गंभीर दखल घेतली आहे. या परिसरातील चार कार्यक्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यांनी निलंबित केले आहे.

Advertisement

दोन निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

ठाणे शहरातील नौपाडा आणि वर्तकनगर येथील डान्स बार सुरू प्रकरणी उशिरा उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.

उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक बजरंग पाटील आणि प्रदीपकुमार सरजीने या अधिकाऱ्यांसह चार जणांचे निलंबन करण्यात आले, तर दोन निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Advertisement

या भागातील सहाय्यक पोलिस आयुक्तांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली. त्यानंतर आता उत्पादन शुल्क विभागानेही त्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.

ठाण्यात ‘डान्स बार’ वर बडगा

दरम्यान, पहाटेपर्यंत सुरू असलेल्या लेडीज बारचे प्रकरण चार पोलिस अधिकाऱ्यांना भोवल्यानंतर खडबडून जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने शहरातील डान्स बारचा शोध घेऊन त्यांना टाळे ठोकण्याची कारवाई सुरू केली आहे.

Advertisement

या कारवाईत दिवसभरात १५ बारना टाळे ठोकण्यात आले आहे. कोरोनाचे निर्बंध झुगारणाऱ्या आणखी काही बारचा शोध महापालिका अधिकाऱ्यांनी सुरू केला असला, तरी हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी चर्चा रंगली आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement