Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

आरोपी बाळ बोठे आणि रेखा जरे यांचे प्रेम प्रकरण होते! बदनामी करू नये म्हणून…

0

MHLive24 टीम, 8 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील पुरवणी दोषारोपपत्र आज पारनेर न्यायालयात दाखल केले गेले आहे.

सुमोर 300 पानांचे हे पुरवणी दोषारोपपत्र असून यामध्ये मुख्य आरोपी बाळ बोठेसह त्याला मदत करणार्‍या अन्य सहा जणांविरूद्ध दोषरोप ठेवण्यात आला आहे.

Advertisement

आरोपी बोठे आणि रेखा जरे यांचे प्रेम प्रकरण होते. यातून रेखा जरे यांनी आपली बदनामी करू नये म्हणून आरोपी बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली.

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुरूवातील पाच आरोपींना अटक केली होती.

Advertisement

अटक केलेल्या आरोपींकडून हत्याकांडामागे मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याची माहिती समोर आली. हत्या झाल्यानंतर बोठे पसार झाला होता. त्यामुळे सुरूवातीला पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींविरूद्ध पारनेरच्या न्यायालयात 720 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते.

बोठे याला 102 दिवसांनंतर हैदराबादमधील बिलालनगर परिसरातून अटक केली. या अटकेला येत्या 10 जून रोजी 90 दिवस पूर्ण होत आहे.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement