‘चाैकशीतून सुटकेसाठी परमबीरांकडून कायद्याचा दुरुपयोग’

MHLive24 टीम, 29 जुलै 2021 :- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात शंभर कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप करण्यापूर्वी त्यांच्याविरोधात अनुप डांगे यांनी तक्रार दिली होती.

या चौकशीतून सुटका होण्यासाठी परमबीर यांनी कायद्याचा दुरुपयोग करत याचिका केली असून त्यांची याचिका उच्च न्यायालयाने थेट फेटाळणे आवश्यक आहे’, असा युक्तिवाद राज्य सरकारच्यावतीने आज मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.

परमबीर यांना कायदा लागू होत नाही का ? :- परमबीर यांच्याविरोधात राज्य सरकारने लावलेल्या दोन प्रशासकीय चौकशींच्या विरोधात परमबीर यांनी केलेल्या याचिकेवर आज न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील दरायस खंबाटा यांनी युक्तिवाद केला आणि परमबीर यांची याचिका फेटाळण्याची विनंती केली.

Advertisement

‘मी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्याविषयी पत्र लिहिले, म्हणून सूडबुद्धीने मला लक्ष्य केले जात आहे.

माझ्याविरोधात एफआयआर केले जात आहेत, असा दावा परमबीर यांच्याकडून केला जात आहे; मात्र असा युक्तिवाद मांडून परमबीर हे त्यांच्याविरोधातील प्रत्येक तक्रारीतून सुटू पाहत आहेत. जणू काही त्यांना कोणताही कायदा लागूच होत नाही अशाप्रकारे सगळे काही सुरू आहे, असे म्हणणे त्यांनी मांडले.

निर्णय ठेवला राखून :- चौकशीच्या प्रगतीबाबत न्यायालयाने अतिरिक्त सरकारी वकील जयेश याज्ञिक यांना विचारणा केली असता दोन्ही प्रकरणात चौकशी अजूनही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. परमबीर यांचे वकील महेश जेठमलानी यांनी या चौकशीबाबत कोणतेही समन्स अथवा नोटीस मिळालेली नाही, असा दावा केला. त्यानंतर परमबीर यांच्या याचिकेवरील आपला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने खून ठेवला आहे.

Advertisement

६ ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण :- दुसऱ्या प्रकरणात परमबीर सिंह आणि राज्य गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला या दोघांच्या याचिकांवरील सुनावणी अपूर्ण राहिल्याने न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने पुढील सुनावणी ६ ऑगस्ट रोजी ठेवली आहे. या वेळी परमबीर आणि शुक्ला या दोघांविरोधात अटकेची कारवाई होणार नसल्याची हमी राज्य सरकारने ६ ऑगस्टपर्यंत कायम ठेवली. त्यामुळे दोघांनाही तूर्त दिलासा मिळाला आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker