Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

राज्यातील सुमारे पावणेतीन काेटी वीज ग्राहकांना प्रीपेड मीटर देणार! असे होतील फायदे…

0 891

MHLive24 टीम, 21 जुलै 2021 :- राज्यातील सुमारे पावणेतीन काेटी वीज ग्राहकांना प्रीपेड मीटर देण्याची तयारी ऊर्जा मंत्रालयाने सुरू केली आहे. त्यासाठी निविदाही मागवण्यात येत आहेत. मुंबई महानगर परिसर, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद यासारख्या महानगरात पहिल्या टप्प्यात सहा लाख स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत.

त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यभर ही याेजना राबवण्यात येणार आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी याबाबत निर्देश दिले आहेत. वीज बिलांची माेठ्या प्रमाणावर थकबाकी वाढत असल्यामुळे वीज कंपन्या ताेट्यात आहेत.

Advertisement

निम्म्यावर ग्राहक वीज बिलाचा वेळेत भरणाच करत नाहीत. कृषी ग्राहकांकडे तर वर्षानुवर्षे थकबाकी असते. दुसरीकडे चोरून वीज वापरण्याचे प्रमाणही कमी करण्यात यश येत नाही. गळतीचे प्रमाणही तसेच वाढत आहे.

या समस्यांवर मात करण्यासाठी महावितरणने सक्तीची वसुली सुरू केली आहे. मात्र त्यामुळे सरकारविराेधात राेषही व्यक्त हाेत आहे. हे सर्व टाळण्यासाठी सरकारने आता प्रीपेड माेबाइलप्रमाणे प्रीपेड वीज मीटर हा प्रभावी मार्ग शाेधून काढला आहे. यासाठी स्मार्ट विद्युत मीटर बसवण्यासाठी योजना राबवण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.

Advertisement

टीव्ही, मोबाइल आपण जसे रिचार्ज करतो, जेवढे पैसे भरले तेवढेच रिचार्ज मिळते. पैसे संपल्याबरोबर ते बंद पडते. तसेच स्मार्ट विद्युत मीटर काम करणार आहे. रीडिंगप्रमाणे अचूक युनिटची नोंद, तेवढेच बिल ग्राहकांना मिळेल. ते वेळेत भरले नाही तर क्षणाचा विलंब न हाेता कनेक्शन बंद पडेल.

कनेक्शन कट करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांना येण्याची गरज भासणार नाही. सर्व ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण पार पाडणार आहे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान मीटरमध्येच बसवलेले असेल. यामुळे नियमित वीज बिल भरण्याचे प्रमाण १०० टक्क्यांवर येईल.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement