Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

अबब! ‘ह्या’ तीन श्रीमंत व्यक्तींकडेच आहे तब्बल 50 हजार करोड़ डॉलरची संपत्ती

0 2

MHLive24 टीम, 6 जून 2021 :- हुरुनने जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. हुरन ग्लोबल रिच लिस्टमध्ये जगभरातील 3228 अब्जाधीशांचा समावेश आहे. एका भारतीय अब्जाधीशलाही यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळाले आहे. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी या यादीत आठव्या स्थानावर आहेत.

हुरुनच्या यादीमध्ये इलोन मस्कला प्रथम स्थान देण्यात आले आहे. हुरुनच्या ग्लोबल रिचेस्ट लिस्टनुसार जगातील पहिल्या 5 श्रीमंत लोकांची वैयक्तिक संपत्ती 10 हजार करोड़ डॉलर्सपेक्षा जास्त आहे. यातील टॉप 3 श्रीमंत मिळून 50 हजार कोटींची संपत्ती असेल. जाणून घ्या सविस्तर…

Advertisement

एलन मस्क: टेस्लाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इलोन मस्क यांकडे 19.7 हजार करोड़ डॉलर (14.41 लाख करोड़ रुपये) संपत्ती असून या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या दशकात सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सर्वात कमी वयाचा माणूस म्हणून ते उदयास आले. वयाच्या 49 व्या वर्षी मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे.

जेफ बेजोस: दिग्गज ई-कॉमर्स कंपनी Amazon चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस गेल्या वर्षी 2020 च्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते, जे या वेळी या यादीत दुसर्‍या स्थानावर आहेत. त्यांची मालमत्ता अंदाजे 18.9 हजार कोटी डॉलर (13.82 लाख करोड़ रुपये) आहे.

Advertisement

बर्नार्ड अर्नाल्ट: जगातील सर्वात मोठी लक्झरी कंपनी एलव्हीएमएचचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नार्ड अर्नाल्ट फ्रेंच अब्जाधीश आणि कला कलेक्टर आहेत. 11.4 हजार करोड़ डॉलर (8.34 लाख करोड़ रुपये) संपत्तीसह ते या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement