Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

कृणाल व हार्दिक पांड्या बंधुंवर दुखःचा डोंगर !

Mhlive24 टीम, 16 जानेवारी 2021: कृणाल व हार्दिक पांड्या बंधुंवर शनिवारी दुखःचा डोंगर कोसळला. त्यांच्या वडिलांचे निधन झाल आहे. हिमांशू पांड्या यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे प्राथमिक माहितीत कळत आहे.

Advertisement

र्दिक आणि कृणाल यांना क्रिकेटपटू घडवण्यात त्यांच्या वडिलांचा मोठा वाचा होता. पण आज अचानक हिमांषू यांना हार्ट अॅटॅक आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

Advertisement

कृणाल सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वें-20 स्पर्धेत खेळत आहे आणि ही बातमी समजताच त्यानं बायो-बबल कवच सोडून तो घरात परतला.

Advertisement

आता तो स्पर्धेत पुढील सामन्यात खेळणार नाही. ”पांड्या कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे आणि त्यामुळे तो स्पर्धा सोडून घरी परतला आहे.

Advertisement

याबाबत बडोद्याच्या क्रिकेट संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर हट्टंगडी यांनी सांगितले की, ” पंड्या यांच्या कुटुंबियांसाठी ही सर्वात वाईट बातमी आहे.

Advertisement

कृणाल पंड्याच्या वडिलांचे निधन झाले असून तो संघाला सोडून घरी पोहोचला आहे. त्यांच्या दुख:त आम्ही सर्व सहभागी आहोत.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement