Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

मुलीच्या लग्नासाठी 60 लाखांचा फंड होईल जमा; पण त्यासाठी करावे लागेल ‘असे’ नियोजन

0 8

MHLive24 टीम, 04 जुलै 2021 :-  आपण जर पहिले तर वैयक्तिक गुंतवणूक करायची असल्यास लहान गुंतवणुकीच्या योजना लोक निवडतात. या लहान योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनांचा समावेश आहे. परंतु बऱ्याचदा यातून आपले लक्ष्य साध्य होत नाही.

यासाठी अनेकदा लोक इतर मार्ग शोधतात. विशेष करून मुलगी जन्माला येताच पालक तिच्या लग्नासाठी पैशाची जमवाजमव करत असतात. जर आपल्याही घरात मुलगी असेल आणि आपण तिच्या लग्नाची चिंता करत असाल तर आपल्याला आता काळजी करण्याची आवश्यकता नाही.

Advertisement

आपण मुलीच्या लग्नासाठी चांगले पैसे जमा करू शकता. यासाठी तुम्हाला फार मोठी रक्कम एकत्र गुंतविण्याची गरज नाही, त्याऐवजी तुम्ही एसआयपीमार्फत दरमहा अल्प रक्कम जमा करून दीर्घकाळामध्ये मोठा निधी मिळवू शकता. मुलींच्या लग्नासाठी आपण 60 लाख रुपयांचा निधी कसा उभारू करू शकता याचे गणित जाणून घेऊयात –

किती वेळ लागेल ? :- 60 लाख रुपयांचा निधी तयार करण्यासाठी प्रथम चांगले रिटर्न कसे मिळवायचे आणि ते कोठून मिळतात हे माहित असणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंड साधारणपणे 10-12 टक्के परतावा देतात.

Advertisement

आपण 12% च्या अंदाजित रिटर्ननुसार दरमहा 6000 रुपयांची गुंतवणूक केल्यास 20 वर्षात 60 लाख रुपयांचा निधी तयार केला जाऊ शकतो. तज्ञांचे म्हणणे आहे की अशा उद्दीष्ट्यासाठी आपण मल्टीकॅप फंड निवडले पाहिजेत. चांगल्या मल्टीकॅप फंडासह आपण 20 वर्षात 60 लाख रुपये जमा करू शकता.

संशोधनाद्वारे एक्स्पर्टच्या मदतीने गुंतवणूक :- म्युच्युअल फंडामधील दुसरी चांगली गोष्ट म्हणजे आपण स्वत: पैशाची गुंतवणूक करत नाहीत. त्याऐवजी, तज्ञ संशोधनाद्वारे आपले पैसे गुंतवतात. पैसे कधी कोठे कसे लावायचे हे त्यांना माहित असते.

Advertisement

म्युच्युअल फंडामध्ये इक्विटी आणि डेब्ट असे साधारणत: 2 प्रकार असतात. इक्विटी योजना शेअर बाजारात गुंतवणूक करतात आणि परताव्याची चांगली अपेक्षा ठेवतात. त्याच वेळी, डेब्ट योजनांमध्ये परतावा कमी असतो. परंतु तेथे धोका, रिस्क आणखी कमी राहते.

डेब्ट स्कीम चा आणखी एक फायदा :- डेब्ट फंड हा कर वाचविण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. डेब्ट फंडावर तुम्हाला मिळणाऱ्या नफ्यावर कर किंवा टीडीएस वजा केला जात नाही. म्हणजेच कर्जाच्या बाबतीत या फंडाचा फायदा होईल. हे लक्षात ठेवा की विक्री किंवा रिडीम कर मात्र आकारला जाईल. तर तुम्ही फंडात 3 वर्षांपेक्षा कमी किंवा 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केली आहे त्या आधारावर कर आकारला जाईल.

Advertisement

लक्ष ठेवणे महत्वाचे :- म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्यावर सतत नजर ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरुन आपणास हे माहित असेल की ज्या ठिकाणी आपले पैसे गुंतवले गेले आहेत त्या योजना फायदेशीर आहेत की नाही. म्हणून वेळोवेळी गुंतवणूकीची तपासणी करत रहा आणि आवश्यक असल्यास पोर्टफोलिओ बदलण्यात अजिबात संकोच करू नका.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement