Mhlive24 टीम, 29 सप्टेंबर 2020 :- सध्या क्रिकेट प्रेमींसाठी महा पर्वणीच सुरु आहे. कारण IPL 2020 चा रणसंग्राम सुरु आहे.
परंतु आता एक वेगळ्याच चर्चेने रंगत आणली आहे. ती म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक अर्थात सारा तेंडुलकर हिचे गॉसिप.
त्याच झालंय असं, मुंबई विरुद्ध कोलकाता या संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याचा एक व्हिडिओ सचिनची मुलगी सारा हिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.
इन्स्टा स्टोरीमध्ये तिनं हा व्हिडिओ शेअर करत त्यावर हार्ट शेप इमोजी जोडले. तिनं पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये शुभमन गिल क्षेत्रलक्षण करताना दिसत होता.
सारानं ही पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर तिच्या आणि शुभमनच्या नावाच्या चर्चांनी जोर धरलाय.
सचिनच्या मुलीचं नाव एका क्रिकेटपटूशी जोडलं जाणं याबाबत नेटकऱ्यांमध्ये भलतंच कुतूहल पाहायला मिळत आहे हे नाकारता येणार ऩाही.
या आधीही झालं होत ‘असे’ काही :- यापूर्वीही सोशल मीडियावर या दोघांनी अनेकांचं लक्ष वेधलं होतं. निमित्तं होतं एका पोस्ट वरील कॅप्शन.
सारा आणि शुभमन या दोघांनीही एकसारखंच कॅप्शन ठेवल्यामुळं नेटकऱ्यांना त्यांच्या नात्याबाबत अनेक प्रश्न पडले.
शिवाय शुभमनच्या पोस्टवर सारानं कमेंट करण, त्यावर शुभमननं उत्तर देणं हे सारंकाही बऱ्याच चर्चांना वाव देणारं ठरत आहे.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर