अबब! तब्बल एक कोटीहून अधिक किमतीची व्हिस्कीची एक बॉटल; सर्व वाचून व्हाल थक्क

MHLive24 टीम, 18 जुलै 2021 :- दारु पिणे जरी आरोग्यासाठी हानिकारक असले तरी देखील जगात मोठ्या संख्येने लोक मद्यपान करतात. काही लोक निर्बंध व नियमांच्या भीतीने छुप्या पद्धतीने मद्यपान करतात आणि काही मोकळेपणाने मद्यपान करतात. दारुचे दर हे पिणार्‍याच्या परिस्थितीवर अवलंबून असतात.

श्रीमंत लोक त्यांच्या घरातील पाहुण्यांना महागडी दारु पाजतात. जेणेकरून त्यांची त्यांच्यासमोर वट वाढेल. आज आम्ही तुम्हाला त्या महागड्या व्हिस्कीच्या किंमतींबद्दल सांगणार आहोत,जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

Advertisement

एका व्हिस्कीच्या एका बाटलीची किंमत तुम्ही थेट एक २ बीएचके फ्लॅट खरेदी करू शकता इतकी आहे. हे ऐकून तुम्हाला मजेदार वाटेल, पण हे खरे आहे. स्कॉटलंडमध्ये तयार केलेली व्हिस्कीची एक अनोखी बाटली दहा लाख पौंड म्हणजे सुमारे १० कोटी २६ लाख रुपयांना विकली जाते.

परंतु अशी एक व्हिस्की बॉटल आहे जी, लिलावात १,३७,००० डॉलर्स म्हणजेच एक कोटीहून अधिक किंमतीला विकली गेली आहे ओल्ड इंगलेड्यूने ही व्हिस्की १८६० साली बाटली बंद केली होती. जवळपास २५० वर्षे जुनी व्हिस्कीची बाटली आहे. ही व्हिस्की प्रसिद्ध फायनान्सर जे.पी.मॉर्गन यांची होती.

Advertisement

जेपी मॉर्गन यांनी १९००च्या दशकात जॉर्जियामधून बाटली विकत घेतली होती. त्यांनी ही बाटली आपल्या मुलाला दिली. त्यानंतर त्याने १९४२ आणि १९४४ दरम्यान दक्षिण कॅरोलिनाचे राज्यपाल जेम्स बायर्न्स यांना ही बाटली दिली. त्यानंतर १९५५ मध्ये पद सोडल्यानंतर दक्षिण कॅरोलिनाचे माजी राज्यपाल जेम्स बायर्न्स यांनी ही बाटली इंग्रज नौसेना अधिकारी फ्रान्सिस ड्रेक यांना दिली.

तीन पिढ्या ही बाटली फिरत आहे. मॉर्गन यांच्या तळघरात ही बाटली होती. तीन पैकी एकच बाटली आता उरली आहे. या बाटलीवर एक लेबल आहे. त्यावर “Bourbon कदाचित १८६५ मध्ये तयार केली आहे. ही जेपी मॉर्गन यांच्या तळघरात होती. मॉर्गन यांच्या मृत्यूनंतर संपत्तीतून ही मिळाली आहे.” असं लिहिलं आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit