7th Pay commission
7th Pay commission

7th Pay commission : केंद्र सरकार असा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे की ज्याचा तब्बल लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. होय केंद्र सरकार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेणार आहे.

केंद्रातील मोदी सरकार पुन्हा एकदा देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांना मोठी बातमी देणार आहे. सरकार लवकरच महागाई भत्त्यात (DA) मोठी वाढ करणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेली कर्मचाऱ्यांची पेन्शनची मागणी पूर्ण होणार आहे.

1 जुलै रोजी सरकारी कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मार्च 2022 मध्ये AICPI निर्देशांकात वाढ झाली होती,

त्यानंतर महागाई भत्ता (DA) वाढण्याची अपेक्षा वाढली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार थेट डीए 4 टक्क्यांनी वाढवू शकते. असे झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए 38 टक्क्यांपर्यंत वाढेल.

DA 4 टक्क्यांनी वाढेल:
1 जुलैपासून कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढणार आहे. पूर्वी 34 टक्के डीए मिळणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता 38 टक्के डीए मिळणार आहे. 2022 च्या पहिल्या दोन महिन्यांत जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये AICPI निर्देशांकात घसरण झाली.

जानेवारीमध्ये 125.1 फेब्रुवारीमध्ये 125 नंतर मार्चमध्ये 1 पॉइंटने वाढून 126 वर पोहोचला. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) पुढील तीन महिन्यांतील एप्रिल, मे आणि जूनचे आकडे 126 अंकांच्या वर राहिल्यास, सरकार DA 4 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते.

38 टक्के असेल तर पगार इतका वाढेल:
कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56900 रुपये आहे, 38 टक्के महागाई भत्ता असेल तर त्यांना 21622 रुपये डीए मिळेल. सध्या 34 टक्के डीए दराने 19,346 रुपये 34 टक्के दराने मिळत आहेत.

डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाल्याने पगारात 2,276 रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजेच त्यात वर्षाला सुमारे 27322 रुपयांची वाढ होणार आहे.

50 लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा :
सरकार वर्षातून दोनदा डीए वाढवते. या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने डीएमध्ये एकदाच वाढ केली आहे. सध्या डीए 34 टक्के आहे.

  • त्यात आणखी 4 टक्क्यांनी वाढ झाल्यास ती 38 टक्के होईल. या निर्णयाचा फायदा 50 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.