Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

50 वर्षीय महिला इन्स्टाग्रामवर अडकली ‘त्या’ डॉक्टरच्या प्रेम जाळ्यात; 80 लाखांचा लागला चुना

0 0

MHLive24 टीम, 14 जून 2021 :- बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या 50 वर्षीय विधवा महिलेला एका व्यक्तीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 80 लाख रुपयांची फसवणूक केली. आणखी दोन-तीन जण यात सामील होते, ज्यांनी स्वतःला अर्थ मंत्रालय आणि नवी दिल्लीतील आयजीआय विमानतळाचे अधिकारी म्हणून स्वतःची ओळख सांगितली होती.

बंगळुरू मिररच्या वृत्तानुसार ही महिला हृदयविकाराची रुग्ण आहे. आणि तिने फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सदर व्यक्ती मेविस हर्मनच्या नावाने इन्स्टाग्राम अकाउंट चालवितो.

Advertisement

प्रेमात अडकवून फसवणूक :-  आपल्या तक्रारीत या महिलेने सांगितले की 23 जानेवारी रोजी तीने इंस्टाग्राम वर मेविस हर्मन नावाच्या कार्डियोलॉजिस्ट असणारी एक प्रोफाइल पहिली. ह्रदयाची रूग्ण असल्याने ही महिला चांगल्या उपचाराच्या शोधार्थ होती.

यासह, ती स्वतःसाठी एक जीवनसाथी शोधत होती आणि मेविस मध्ये तिला जोडीदाराचे गुण दिसले. यानंतर ते एकमेकांशी बोलू लागले आणि त्यानंतर हर्मनने देखील या महिलेच्या आजाराच्या उपचारांबद्दल बोलले.

Advertisement

काही दिवसांनंतर हर्मन ने त्या महिलेला सांगितले की त्याने तिला कुरिअरद्वारे एक सरप्राईज गिफ्ट पाठवले आहे. यानंतर, तिला कस्टम अधिकारी म्हणून काही लोकांनी कॅल केला आणि गिफ्ट बॉक्स मध्ये त्यांना 35,000 पौंड सापडल्याचे सांगितले.

बेंगळुरू मिररच्या म्हणण्यानुसार, महिलेने सांगितले की तिला हर्मनकडून कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तूची अपेक्षा नव्हती आणि नंतर दिल्ली विमानतळ अधिकारी म्हणून बोलणाऱ्या या लोकांनी कोणत्याही अडचणीशिवाय हा प्रश्न सोडविण्यासाठी पैशांची मागणी केली.

Advertisement

हर्मनला कोणत्याही कायदेशीर प्रकरणांपासून दूर ठेवण्यासाठी फॉरेन करेंसी कन्वर्जन चार्जेज, ट्रांसफरिंग चार्जेज, कर या स्वरूपात त्यांनी मोठ्या रकमेची मागणी केली. तिने खूप पॆसे त्यांना दिले. त्यानंतर तिला फसवणूक झाल्याची जाणीव झाली. आणि तिने पोलिसांत धाव घेतली.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

 

Advertisement