Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

३ महिला पत्रकारांची गोळ्या घालून हत्या !

Advertisement

Mhlive24 टीम, 04 मार्च 2021:अफगाणिस्तानमध्ये तीन महिला पत्रकारांची गोळी मारून हत्या करण्यात आली. तिघींची हत्या वेगवेगळ्या हल्ल्यात झाली. या महिला एनिकास टीव्हीसाठी काम करत होत्या.

वाहिनीचे संचालक जलमई लतिफी म्हणाले, तिघीही प्रसिद्ध भारतीय नाटके तसेच मालिकांचे अफगाणिस्तानच्या स्थानिक भाषांत अनुवाद तसेच डबिंगचे काम करत.पहिली घटना जलालाबादची आहे.

Advertisement

सादिया व शहनाज नावाची महिला घराबाहेर फिरत होत्या. त्याचवेळी अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. दोन्ही महिला घटनास्थळी मृत्युमुखी पडल्या. दुसरी घटनाही त्याच शहरातील आहे.

त्यात मुरसल हबीबची गोळी घालून हत्या करण्यात आली. इस्लामिक स्टेटच्या स्थानिक गटाने हत्येची जबाबदारी घेतली आहे.

Advertisement

अफगाणिस्तानात पत्रकार, धार्मिक विद्वान, सामाजिक कार्यकर्ते व न्यायाधीशांच्या हत्या वाढल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील अनेकांवर लपून बसण्याची वेळ आली आहे. काहींनी देश सोडला आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर
Advertisement