Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

१५ वर्षांचे नाते संपुष्टात ! मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान व पत्नी किरण रावच्या नात्यात दुरावा ….

0 8

MHLive24 टीम, 03 जुलै 2021 :-  बॉलिवूड अभिनेता आमिर खानचे दुसरे लग्न मोडले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दोघांनी 28 डिसेंबर 2005 रोजी लग्न केले होते. लग्नाच्या 15 वर्षांनी दोघांनी घटस्फोटाचा निर्णय का घेतला, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

Advertisement

हिंदी कलाविश्वातील मिस्टर परफेक्शनिस्ट, अर्थात अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांची जोडी परफेक्ट कपल म्हणून संबोधली जात असतानाच या जोडीच्या नात्यात दुरावा आला आहे.

जवळपास 15 वर्षांच्या वैवाहिक नात्यानंतर अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी हे नातं संपुष्टात आणलं आहे. शनिवारी या दोघांनीही त्यांच्या या निर्णयाची अधिकृत घोषणा केली.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit