Discount offers on SUV cars : जोरदार ऑफर! ‘ह्या’ 4 आलिशान SUV वर मिळतेय 1.30 लाख रुपयांपर्यंत सूट

MHLive24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- 2021 हे वर्ष संपणार आहे. थोड्याच दिवसात नवीन वर्ष सुरू होईल. याच अनुशंघाने कार खरेदीवर प्रचंड सूट कंपन्या देणार आहेत.(Discount offers on SUV cars)

टाटा ते महिंद्रा आणि ह्युंदाईपासून मारुती सुझुकीपर्यंत सर्वच कंपन्या कार खरेदीवर भरघोस सूट देत आहेत. प्रत्यक्षात हे इन्व्हेंटरी खाली करण्यासाठी केले जात आहे.

दरम्यान जानेवारीत वाहनांच्या किमती वाढणारआहेत. दरम्यान, जर तुम्ही नवीन SUV कार घेण्याचा विचार करत असाल तर ही योग्य संधी आहे. बाजारात 4 SUV वर 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. चाल जाणून घेऊयात

Advertisement

रेनो डस्टर

Renault Duster SUV वर 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत कमाल सूट मिळत आहे. Renault Duster SUV खरेदी केल्यास 50,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, 50,000 रुपयांपर्यंत रोख सवलत आणि 30,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट फायदे मिळतील.

Renault Duster SUV मध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.3-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. यामध्ये पहिले इंजिन 106hp आणि दुसरे इंजिन 156hp चे आहे.

Advertisement

निसान किक्स

Nissan Kicks SUV कार खरेदीवर तुम्हाला कमाल 1 लाख रुपयांची सूट मिळेल . Nissan Kicks SUV खरेदी केल्यावर 70,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, 15,000 रुपयांपर्यंत रोख सूट आणि 10 हजार रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट फायदे दिले जातील.

ऑनलाइन बुकिंग केल्यावर तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळेल. Nissan Kicks SUV मध्ये 1.3-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर पेट्रोल इंजिन देखील आहे.

Advertisement

महिंद्रा XUV300

दुसरीकडे, महिंद्राची XUV300 खरेदी केल्यास, तुम्हाला कमाल 69 हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. Mahindra XUV300 खरेदी केल्यावर, तुम्हाला 25,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, 30 हजार रुपयांपर्यंत रोख सूट आणि 4,000 रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट फायदे मिळतील.

महिंद्रा KUV100

Advertisement

महिंद्राची आणखी एक कार आहे जी तुम्ही खरेदी करून प्रचंड सूट मिळवू शकता. महिंद्रा KUV100 मध्ये 1.2L 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे 83hp चे उत्पादन करते.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker