MHLive24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- कोरोनाच्या काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. यातील अनेक तरुण गावाकडे आले. याचाच काळात हरियाणातील सोनीपतमधील शहजादपूर गावात राहणाऱ्या कपिलने आपली बँक नोकरी सोडून शेतीकडे लक्ष वळवले.(Inspirational Story)

बँकेची नोकरी सोडली आणि पेरू शेती सुरू केली

कोरोना येण्यापूर्वी कपिल बँक सेक्टरमध्ये काम करत होता, पण कोरोना आल्यानंतर त्याची सोनीपतहून गुजरातमध्ये बदली झाली. अशा परिस्थितीत कपिलने गुजरातला न जाता पेरूची सेंद्रिय शेती करण्याचा विचार केला. अन पाहता पाहता नोकरीत मिळणाऱ्या पगारापेक्षा कमाई ४ पट वाढली.

पेरूच्या 8 जातींचे उत्पादन

कपिल आपल्या बागेत पेरूच्या 8 प्रकारांची लागवड करतो. त्यांच्या पेरूचा दर्जा तैवानच्या पेरूलाही मात देतो. कपिलला त्याची फळे भाजी मंडईत पाठवण्याचीही गरज नाही, खरेदीदार स्वतःच त्यांना ऑर्डर देतात आणि पेरू घेऊन जातात.

कपिल सांगतात की, नोकरी सोडून स्वतःची बाग लावली. आता तो महिन्याला लाखो रुपये कमवत आहे. त्यांचे हे यश आता अनेकांना प्रेरणा बनत आहे. त्यांच्याकडून टिप्स घेण्यासाठी दूरदूरवरून तरुण-तरुणी येतात.

आता सुरू केली लिंबू शेती

पेरूच्या लागवडीसोबत कपिल आपल्या शेतात लिंबाचीही लागवड करत असून, या सेंद्रिय लिंबाची भाजी मंडईत विक्री करण्याऐवजी तो लोणची बनवून त्याची विक्री करत आहे, त्यातून त्याला भरपूर नफाही मिळत आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit